#ओवी लाईव्ह.. Vision Statement
"चला, पटापटा! आपला project report आज पूर्ण केला पाहिजे!" नेहाने सगळ्यांना जागे केले.
"यार! अजून दोन दिवस आहेत ना!" प्रीतमने नेहेमी प्रमाणे चालढकल करायला सुरुवात केली.
"आज तयार केला तर review आणि दुरुस्ती करायला वेळ मिळेल. काय काय राहिलाय ते पाहू ... " नेहा कामालाच लागली. Project report open केला. विद्या आणि शुभम पण खुर्च्या घेऊन सरसावून बसले. नाईलाजाने प्रीतम पण येऊन बसला.
"हंमम ... vision statement, executive summary, conclusion बस्स! इतकच तर राहिलंय!" नेहा म्हणाली.
शुभम म्हणाला, "Conclusion तर ठीक आहे - चारोळी फोडायचं यंत्र तयार करण्यात आम्हाला यश आले. ह्या यंत्रामुळे एका दिवसात आधीपेक्षा १२५ पट अधिक चारोळ्या फोडता आल्या." नेहाने ते लगेच टाईप केले. विद्याने summary सांगितली. ती पण लिहून झाली.
आणि मग गाडी अडली ती vision वर. "काय लिहायचं नक्की? Vision! Vision!! Vision!!"
मग चौघांचा कंपू staff room मध्ये, त्यांचे project guide, मोहनीश सरां पुढे ठाकला.
"सर, आम्हाला Vision Statement नक्की कसं लिहायचं ते कळत नाहीय."
मोहनीश म्हणाले, "तुम्ही जे चिरोंजी फोडायचे यंत्र केले आहे, ते का केले, कुणासाठी केले, त्याचा फायदा काय? ते का करावेसे वाटले? हा खटाटोप कशासाठी केला? हे सगळं म्हणजे vision statement."
"Well! ह्या term मध्ये project compulsory होते म्हणून केलं!" प्रीतमने तारे तोडले.
"Project करायचाच होते रे, पण 'हेच' का केले ते लिहायचंय, बावळट!" विद्याने कान पिळला.
"सर, आम्ही हे project निवडलं कारण बाजारात चारोळ्या फोडणारे यंत्र नाही. हातोडीने किंवा दगडाने चारोळी फोडतांना कामगारांच्या हाताला, बोटांना दुखापत होते. दिवसभर काम करून पण फारसे output मिळत नाही. साहजिकच कष्ट करून सुद्धा त्यांची परिस्थिती हालाखीचीच राहते. त्यांच्या जीवनात फरक पडावा, त्यांच्या उपजीविकेच्या साधनाने त्यांना एक diginified life जगता यावे म्हणून हे यंत्र करायचे ठरवले." शुभमने group चे विचार मांडले.
"शाब्बास!", मोहनीश सर आनंदाने म्हणाले, "आता हे मोजक्या शब्दात लिहिलं की तुमची vision statement तयार.
"एखादी गोष्ट आपण का करतो त्याची आठवण करून देते ती Vision statement. आपल्याला long-term मध्ये काय achieve करायचे आहे, ते Vision statement सांगते. ती जितकी clear असेल, inspirational असेल तितकी ती आपल्याला ध्येया पर्यंत जायला मदत करते. ती आपल्याला मन लावून, तळमळीने काम करायची ऊर्जा देते, शक्ती देते.
“हे project जर प्रीतम म्हणाला तसं केवळ submit करायचं म्हणून केलं असते, तर हे काम करण्यात इतका आनंद मिळाला असता का? तुम्ही एवढी मेहेनत घेतली असती का? मला खात्री आहे की तुमचा project इथे submission नंतर संपणार नाहीये, तुम्ही पुन्हा पुन्हा गुणिरामला भेटून त्याला तुमच्या यंत्राचा फायदा हातोय हे पाहाल.”
"हो सर! खरंय तुमचं. शुभम आणि विद्या कितीतरी वेळा गुणिरामला भेटायला जातात!", नेहा म्हणाली.
“Project प्रमाणेच आपल्या आयुष्याला पण एक vision हवं. नाही तर प्राण्यांसारखं आला दिवस घालवायचा असं जगणं होईल."
सरांकडे जातांना project च्या vision चा प्रश्न डोक्यात होता. आणि तिथून बाहेर पडतांना सरांनी डोक्यात नवीन किडा घातला होता– vision statement for life!

ज्ञानेश्वर म्हणतात–“मी अनेक पदरांचा, नक्षींचा, रंगांचा, सुरांचा, परिमळांचा - मनमोहक असा गीतेचा अर्थ सांगीन. किंबहुना संपूर्ण विश्व गीतार्थाने भरीन. आणि त्या योगे जगा भोवती आनंदाचे आवार उभे करीन!”
अशी उदात्त vision असेल, तर हातून अजरामर निर्मिती का होणार नाही?
-दिपाली पाटवदकर
