आकाशाशी जडले नाते- रविवार

27 Jul 2016 15:02:00

"आबा, मागच्या वेळेला तुम्ही मनुष्याचे जीवन सूर्य-चंद्र-ग्रह-नक्षत्रां प्रमाणे चालते असे म्हणाला होता. And we agreed, की दिनचर्या सूर्याप्रमाणे चालते.

“आज तुम्ही मला आणखी काही उदाहरणे सांगणार होता." सुमितने आठवण केली.

"मी तुझी वाटच पहात होतो. बघ इथे, ‘कालनिर्णय’ वर टिपणी करून ठेवली आहे.

"तर, get ready for a rapid fire session!"

"OK! Fire!"

"कोणत्या दिवशी तुझे दुपारचे जेवण हमखास उशिरा होते?"

"शुक्रवारी! Weekly report असतो ना आबा!"

"कोणत्या दिवशी formal पेहराव करून जातो?"

"सोमवारी! माझी VP बरोबर meeting असते!"

"कोणत्या दिवशी मारुतीला जातोस?"

"अर्थात शनिवारी!"

"कोणत्या दिवशी गाढवासारखा लोळत पडतोस?" मिशीतल्या मिशीत हसत आबा म्हणाले.

"रविवार", सुमित ओशाळून म्हणाला, "पण एकच तर दिवस मिळतो ना असा!"

"बघ हं गंमत! तू कोणते कपडे घालणार, किती वाजता जेवणार, किती वेळ लोळणार हे ग्रहांच्या गतीवर अवलंबून आहे. आताच नाही, अगदी लहान असल्यापासून. Weekly चाचणी, शनिवारची सकाळची शाळा, रविवारची सुट्टी, सगळी गणिते सूर्य, चंद्र व ग्रहांच्या speed वर अवलंबून."

"डोळ्यांना दिसणाऱ्या ग्रहांची नावे वारांना दिली आहेत, म्हणून ग्रहांप्रमाणे चालतंय असं म्हणले, तर खरंय! पण ग्रहाच्या गतीशी काय संबंध?" सुमितने प्रश्न केला.

"ग्रहांच्या गतीप्रमाणे वारांची नावे व क्रम कसा ठरला हे ६व्या शतकातील 'सूर्य सिध्दांत' मध्ये दिले आहे. सर्वात कमी गती ते सर्वात अधिक गती या प्रमाणे ग्रहांचा क्रम लावला. दिवसाच्या प्रत्येक होऱ्याचे (hour) अधिपत्य एका ग्रहाला दिले. पहिल्या होऱ्याचा जो अधिपती तोच ग्रह दिवसाचा पण अधिपती. या पद्धतीने आजच्या दिवसाचा अधिपती एक ग्रह असेल तर उद्या त्याच्यापासून चौथा ग्रह दिवसाचा अधिपती होतो. एकूण ग्रहांच्या गती प्रमाणे वारांचा क्रम लागतो. आणि अधिपतीचे नाव वाराला दिले गेले.

"इजिप्ट, ग्रीस, रोम, बेबिलॉनच्या संस्कृतींमध्ये सुद्धा अशीच नावे व असाच क्रम फार पूर्वीपासून आहे. इंग्रजीत सुद्धा तशीच नावे व क्रम दिसतो, जसे

सोम + वार = 'moon' + day

रवि + वार = 'sun' + day

"हे आठवड्याचे चक्र Office मध्ये, शाळांमध्ये काटेकोरपणे वापरले जाते. त्यामुळे अनेक महत्वाच्या गोष्टी आपोआप केल्या जातात. जसे PT चा तास, संगीताचा तास, किंवा आठवड्याचा आढावा घेणे इत्यादी.

"असेच आठवड्याचे वेळापत्रक स्वतः साठी करून आपणही आठवड्याचा उपयोग करून घेऊ शकतो. जसे रविवारची संध्याकाळ आठवड्याचे planning करण्यासाठी वापरावी. कपड्यांचे, स्वयंपाकाचे, कलासाचे, बिलं भरायचे, अभ्यासाचे, वाचनाचे planning जर करून ठेवले तर आठवडाभर होणारा रोजचा planning चा stress कमी होतो.

“शिवाय आठवड्यातील ठराविक दिवस gym चे. उत्तम आरोग्यासाठी ठराविक दिवस उपासाचे. तुझ्या आजीच्या मंगळवार – शुक्रवार सारखे!” डोळे मिचकावत आबा म्हणाले. "मी चेष्टेने म्हणत नाहीये बरं दुर्गाबाई! सध्या अमेरिका व यूरोप मध्ये ५:२ Diet पद्धत वेग धरत आहे. आठवड्यातून दोन दिवस उपास करणे दीर्घायुष्यासाठी कसे उत्तम आहे याचा प्रचार scientist करत आहेत.”

आजीची करडी नजर पाहून, आबा हळूच म्हणाले “सुम्या, आणखीन दाखले आहेत, पण ते पुढच्या भेटीत बोलू. दुर्गाबाईंनी तुझ्यासाठी केलेली खिचडी तुला गरम-गरम खाऊ दिली नाही, तर ती मला खाईल!"

 

Powered By Sangraha 9.0