'भारतीय योग', जागतिक संस्कृतीचा अमूर्त वारसा : यूनेस्को

01 Dec 2016 17:40:00



भारताची संस्कृती प्राचीन आहे. भारतीय संस्कृतीतील अनेक महत्वाच्या बाबींना जगमान्यता मिळाली आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच यूनेस्कोने 'भारतीय योगाला' जागतिक संस्कृतीचा अमूर्त वारसा घोषित केला आहे.

दोन वर्षांआधी डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ११ डिसेंबर जागतिक योगा दिन म्हणून घोषित केला होता. आज १ डिसेंबर रोजी, तब्बल दोन वर्षांनंतर युनेस्कोने 'भारतीय योगा' ला जागतिक संस्कृतीचा अमूर्त वारसा म्हणून घोषित केला आहे.



इथोपिया येथील आदिस अबाबा येथे आयोजित यूनेस्कोच्या बैठकीत या निर्णयाची औपचारिक घोषणा करण्यात आली.

'योग' हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून भारतात योगाचे खूप महत्व आहे. योगा एक अशी कला आहे, जी आत्मसात केल्यामुळे कुठल्याही व्यक्तिच्या अंगात ऊर्जा आणि मनात सकारात्मक भाव निर्माण होतात. तसेच एकाग्रतेच्या दृष्टीने देखील योगाचे खूप महत्व आहे.


योगामुळे माणसाचे केवळ शरीरच स्वस्थ राहत नाही तर यामुळे मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम राहते. भारतीय योगाचे महत्व संपूर्ण जगाला आता पटले आहे. यूनेस्को ने भारतीय योगाला जागतिक संस्कृतीचा अमूर्त वारसा घोषित करणे भारतासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.

Powered By Sangraha 9.0