#Whatsup buddies? अॅण्ड शी लेफ्ट द ग्रुप.....

28 Oct 2016 14:43:00

छाया, अदिती सौम्या, अबोली आणि अस्मिता (बेस्ट फ्रेंड्स ग्रुप वर )..

छाया : अदिती अगं कसला भारी फोटो आलाय. मॅडम क्या बात है.

सौम्या : बघ की, अगं एक नंबर नक्कीच काही तरी खास आहे.

अबोली : अगं बघ ही तर फोटो टाकून गायब पण झाली.

अदिती : अगं मुलींनो गप बसा की, असं काहीही नाहीये, सहज आपला काढला सेल्फी आवडला म्हणून टाकला.

अस्मिता : ओहो ओहो, सहज सेल्फी काढलाय मॅडम ने. आम्हालाही माहिती आहे, आमच्यात सगळ्यात सुंदर तू आहेस. मग मिरवायचं काय त्यात :P

अदिती : अगं मिरवायचं काय म्हणजे. काही बोलतेस का? मिरवायला टाकलेला नाही मी तो फोट, अगदी सहज टाकलाय.

अस्मिता : हो हो.. कळतयं :P

अबोली : फेअर अॅण्ड लव्हली गर्ल, चिडू नकोस इतकी लगेच आता.

सौम्या : हाहाहाहाहाहाहा... फेअर अॅण्ड लव्हली म्हणे.. काही काय,, दोन तीन मुलांनी प्रपोझ केल्यावर काय कुणी लगेच फेअर अॅण्ड लव्हली गर्ल होत नसतं. ए अदिती जस्ट किडिंग हान.

अदिती : सौम्या क्या यार? हे ग्रुप वर टाकण्यासारखं होतं तरी का? कुणाल आणि अक्षय च्या प्रपोझल बद्दल ग्रुप वर का टाकतेयस. आय टोल्ड यू कॉज आय हॅ़ड ट्रस्ट.

छाया : ए मुलींनो कुठला विषय कुठे नेताय. दिती.. फोटो छान आलाय. आणि इट्स ओके, सगळे चिडवताते. खूप सीरीयसली घेवू नकोस.

अदिती : अगं मग एका लिमिट मध्ये चिडवायचं ना? हे काय मुलांचे प्रपोझल्स वगैरे.

अबोली : अच्छा म्हणजे मॅडम तुम्हाला आमच्यावर ट्रस्ट नाहीये तर. म्हणून आम्हाला नाही सांगितलस, सौम्यालाच सांगितलसं.

सौम्या : अगं ट्रस्ट कुठे आला आता यात. आपण सगळ्याच मैत्रिणी आहोत अॅण्ड इट्स सो नॉरमल चिल.

अदिती : बास झालं बाय गर्ल्स मला नाही बोलायचय या विषयावर.

Aditi left.

सौम्या : अगं हिला इतकं चिडायला काय झालयं? ठीके ना गंमत सुरु होती.

छाया : अगं सोमे तुला तरी काय गरज होती नसत्या गोष्टी काढायची. गप बसायचं की जरा वेळ. अॅड करा तिला.

अबोली. : अगं कसला भाव खाते ही. नाही करणार मी अॅड. काय हे एवढ्या तेवढ्या गोष्टींवरुन चिडायचं. हाट.

अस्मिता : अगं पाच मिनिट फोन काय ठेवला इतके मॅसेजेस आणि हिला काय झालं. कुणी प्रपोझ केलं बाय द वे.

छाया : कुणाचं काय तर कुणाचं काय इथे अदिती चिडून ग्रुप सोडून गेलीये आणि तुला कुणी प्रपोझ केलयं याचं पडलयं...

(तिकडे अदिती)

मनातल्या मनात : मी उगाचच फोटो टाकला. किंमत नाही कुणाला, मी सुंदर दिसणं मिरवते. मी? काय हे. सौम्याला तरी का गरज होती त्या प्रपोझल्स बद्दल बोलायची हुह... जावू देत.. आता ना बोलणारच नाहीये मी..

कधी कधी कसं होतं ना अगदी फुटकळ बालिश कारणांवरुन देखील मोठी भांडणं होवू शकतात. आजच्या व्हॉट्सअॅपच्या काळात अशा ग्रुप फाईट्समुळे ईगो, फ्रस्ट्रेशन, इरिटेशन यामध्ये खूप वाढ झालीये. नक्की काय होतय? माध्यमं बददली म्हणून आपली नाती बदलली का? माध्यमांचा योग्य वापर आपण करु शकलेलो नाही?

- निहारिका पोळ

Powered By Sangraha 9.0