अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम तमिळ भाषेत प्रसारित करा, गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

    08-Mar-2025
Total Views |

Amit Shah
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.
 
त्यानंतर पुढे अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकराने अनेक बदल केले आहेत. ज्यामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परीक्षा तमिळ भाषेसोबत प्रादेशिक भाषांमध्ये घेता येईल.
 
शाह म्हणाले, मी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्यात तमिळमध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचे आवाहन करतो. तसेच त्यांनी सांगितले की, इतर अनेक राज्यांनी त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण देण्यास सुरूवात केली. आता तामिळ भाषेतही त्यांनी संबंधित विषयांचा अभ्यासक्रम आणावा.
 
 
 
अमित शाह यांनी केलेल्या विधानाने तमिळनाडूच्या जनतेमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. हे ऐकून मोदी सरकारचे कौतुक होत आहे. तमिळ भाषिक असेही म्हणतात की, केंद्र सरकार त्यांच्या भाषेचा आदर करते आणि त्यात वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या शिक्षणावर भाष्य करत आहेत. अशातच अलिकडेच तामिळनाडू राज्य सरकारने नवीन शिक्षण धोरणावर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर हल्ला केला.
 
त्यांनी पुढे म्हटलं की, केंद्र सरकार हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाषेमुळे भेदभाव निर्माण होऊ नये. भाषा ही लोकांना संस्कृतीसोबत जोडत असते, असे असूनही, द्रमुक फक्त तमिळ आणि इंग्रजी या दोन भाषांच्या धोरणांचे पालन करण्यावर ठाम आहे.