पंतप्रधान रमले 'वनतारा'च्या वाघ-सिंहासोबत

    04-Mar-2025
Total Views |
vantara wildlife rescue and rehabilitation center



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वन्यजीवांच्या संवर्धन, उपचार आणि देखभालीसाठी उद्योजक अनंत अंबानी यांच्या संक्लपनेमधून साकार झालेल्या जामनगर येथील 'वनतारा'ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली (vantara wildlife rescue and rehabilitation center). यावेळी त्यांनी 'वनतारा'मध्ये सुरू असलेल्या वन्यजीव संवर्धन, उपचार आणि देखभालीच्या कामांची पाहणी केली (vantara wildlife rescue and rehabilitation center). तसेच पंतप्रधान काही वन्यजीवांसोबत रमलेले देखील दिसले. (vantara wildlife rescue and rehabilitation center)
 
 
 
'वनतारा' हे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि 'रिलायन्स फाऊंडेशन' यांच्यामार्फत सूरू करण्यात आलेले वन्यजीवांचे केंद्र आहे. हे केंद्र जामनगर रिफायनरी काॅम्प्लेक्समधील ३ हजार एकर क्षेत्रावर पसरलेले आहे. याठिकाणी जगभरातील दुर्मीळ आणि संकटग्रस्त वन्यजीवांचे संगोपन, उपचार आणि देखभाल केली जाते. तसेच संकटग्रस्त वन्यजीवांचे पुनर्वसन, स्थानांतरण या बाबींसाठी देखील 'वनतारा' शास्त्रीय मदत पुरवते. या केंद्रामधील वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी पंतप्रधान 'वनतारा'मधील विविध परदेशी वन्यजीवांसोबत रमलेले दिसले. वाघाच्या बछड्यांंना आणि सिंहाच्या छव्यांना त्यांनी दूध पाजले. जिराफ आणि हत्तींना त्यांनी खाद्य घातले. तर वन्यजीवांवर होणाऱ्या उपचारांची देखील त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
 
 
 
भेट दिल्यानंतर मोदी यांनी सांगितले की, "'वनतारा'चे प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहेत. आपण ज्या जीवांसोबत शतकानुशतके सहवास करत आहोत, त्यांच्या संरक्षणासाठी केलेले हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत." अनंत अंबानी म्हणाले की, "सनातन धर्मामध्ये प्रत्येक देवतेचे प्राणी स्वरुपाने वाहन आहे. ऋग्वेदात, कृष्ण म्हणतो की सर्व जीव समान आहेत. मग ते मानव असोत, मधमाशी असोत, किंवा मुंगी असोत. सर्वकाही समान आहे. त्यामुळे 'वनतारा'मध्ये आम्ही बेडकांपासून उंदरांपर्यंत सर्व प्राण्यांची काळजी घेतो." भारत सरकारने नुकतेच 'वनतारा'ला 'कॉर्पोरेट' श्रेणीमध्ये प्राणी कल्याणातील भारतातील सर्वोच्च सन्मान 'प्राणि मित्र' राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.