प.बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसूंवर हल्ला, अनेक प्राध्यपक जखमी
प.बंगाल सरकारवर भाजप नेत्याचा निशाणा
02-Mar-2025
Total Views | 17
कोलकाता : प.बंगाल राज्यातील कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठात एसएफआय आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांशी संबंधित असलेल्यांनी शिक्षणमंत्री ब्रात्य बसूंवर हल्ला केला. विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होती. याबाबत आता शनिवारी १ मार्च २०२५ रोजी निदर्शने सुरू करण्यात आली होती, आता त्याला हिंसक वळण प्राप्त झाले आहे.
निदर्शने करणाऱ्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या वाहनावर हल्ला केला आणि त्या वाहनाचे टायर फोडण्यात आले होते. यावर मंत्री म्हणतात की, त्यांच्यावर वीट फेकण्यात आली, ज्यामुळे त्यांचा हात आणि चेहरा जखमी झाला होता. यानंतर त्यांनी उपचारासाठी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Bengal #EducationMinister@basu_bratya attacked in Jadavpur University. His car got damaged . Minister taken to hospital . Left students were protesting while Minister was went there to attend #TMC professors unions ( WEBCUPA ) program . Students were protesting demanding… pic.twitter.com/rOI90H730v
— Kamalika Sengupta (@KamalikaSengupt) March 1, 2025
या प्रकरणासंबंधित एका वृत्तानुसार, शनिवारी १ मार्च रोजी तृणमुल विद्यार्थी संघटनेचे काही विद्यार्थी महाविद्यालात एका बैठकीला आले होते. तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या संबंधित असलेल्या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी मंत्र्याच्या वाहनाचा रस्ता आडवला होता. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी दोन पायलट वाहनाचीही तोडफोड करण्यात आली होती.
हल्लेखोरांनी प्राध्यापक ओमप्रकाश मिश्रा यांच्यावर हल्ला केला होता. एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली, तर दोन प्राध्यापकही जखमी झाले होते. एका महिला प्राध्यपकाची साडी फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Just the other day, Mamata Banerjee was fist pumping and waxing eloquent about winning in 2026. Today, Bratya Basu, West Bengal’s Education Minister, was accosted by angry students at Jadavpur University. Basu’s cavalcade nearly ran over a student on campus, further agitating the… pic.twitter.com/TKqfOI1NuA
याचपार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, आरजी कर बलात्कार आणि खूनाच्या प्रकरणात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गोंधळ सुरू असताना विद्यापीठात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना घोषणाबाजी करत होते".