टीम इंडियाची विजयी हॅट्रीक, किवींना पाजलं पराभवाचं पाणी

    02-Mar-2025
Total Views |
 
IndiaVs New zealand
 
यूएई : न्यूझीलंड विरूद्ध टीम इंडियादरम्यान (IndiaVs New zealand), चॅम्पियन्स ट्रॉफीचा तिसरा सामना दि : २ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडला. या सामन्यात सुरूवातीला न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये २४९ धावांचे लक्ष दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर किवींना म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाने २०५ धावांवर सर्वबाद करत किवींना गारद केले. हा या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील टीम इंडियाचा सलग तिसरा विजय आहे.
 
किवींनी प्रथम नाणेफेकी जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी शुभमन गिलला हेन्रीने केवळ २ धावांवर एलबीडब्लू स्वरूपात बाद केले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळपट्टीवर होते. मात्र, रोहित शर्मालाही म्हणावी अशी फलंदाजी करता आली नाही. रोहितने १७ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५ धावा करत जेमीसनने पॅव्हेलियनने रोहितला बाद केले. त्यानंतर टीम इंडियाला गळती लागली.
 
रोहितनंतर विराटच्या रुपात तिसरा धक्का बसला, विराटने केवळ ११ धावा करत पॉइंटच्या दिशेने चेंडू मारला. मात्र, क्षेत्ररक्षक फिलीप्सने चांगली कामगिरी करत झेल टीपला. त्यानंतर श्रेयश अय्यर आणि अक्षर पटेल हे खेळपट्टीवर होते. टीम इंडियाच्या संघाला त्यांनी सावरले. त्यानंतर श्रेयश अय्यर ७९ धावा करत तंबूच्या आश्रयाला गेला. त्यानंतर रवींद्र जडेजा, केएल राहुल, हार्दिक पांड्या असे टीम इंडियाचे एकूण नऊ गडी बाद झाले.
 
 
 
न्यूझीलंड संघाची इनिंग
 
टीम इंडियाने किवींना २४९ धावांचे लक्ष दिले. त्यानंतर किवींकडून प्रथम रचिन रवींद्र सलामीला आला होता, तेव्हा हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर रचिन रविंद्र झेलबाद झाला. किवींना रचिन रवींद्रच्या रुपात पहिला हादरा बसला. त्यानंतर विल यंगला वरूण चक्रवर्तीने बाद केले. त्यानंतर डॅरेल मिचेलला कुलदीप यादवने १७ धावांवर एलबीडबल्यू बाद केलं. त्यानंतर मिचेल सँटनर २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर मॅट हेन्री हा नववा गडी आणि विलियमची अंतिम म्हणजेच दहावी विकेट पडल्याने टीम इंडियाने सलग तिसरा विजय मिळवला. यात सर्वात महत्त्वाची खेळी ही वरूण चक्रवर्तीची आहे. 
 
सामन्याचा हिरो वरुण चक्रवर्ती
 
या सामन्यादरम्यान, वरुण चक्रवर्ती हा विजयी सामन्याचा हिरो आहे. वरूणने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. तर इतर गोलंदाजांनीही विजयात योगदान दिलं. टीम इंडियाचा हा साखळी फेरीतील सलग तिसरा विजय आहे. टीम इंडियाने याआधी पाकिस्तान आणि बांगलादेशचा धुव्वा उडवला होता.