नरेंद्र मोदींच्या काळातच पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील होणार - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

    01-Mar-2025
Total Views |

Pakistan-occupied
 
नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही अद्यापही जम्मू-काश्मीरचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. अशातच आता दिल्लीचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मोठे विधान केले आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरची (POJK) वापसी होणे हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातच होईल. जम्मू काश्मीर पीपल्स फोरम आणि मीरपूर (POJK) बलिदान समितीने आयोजित केलेल्या (POJK) संकल्प दिवस कार्यक्रमात त्यांनी सांगितले. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, (POJK) भारतात विलीन करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरेल. दरम्यान यावेळी बोलत असताना माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि जिनांबाबत भाष्य केले.
 
नेहरू-जिना यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे भारताची फाळणी झाली ही एक मोठी चूकच होती. त्याचे कारण हे नेहरू आणि जिना असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जेव्हा १९४८ साली भारतीय सैन्यदल हे मीरपूरला दाखल झाले होते. तेव्हा नेहरूंनी युद्धबंदीचा आदेश जारी केला होता. हे प्रकरण आता संयुक्त राष्ट्रांकडे नेण्यात आले. जर हे घडलेच नसते तर आज (POJK) भारताचा भाग असता. त्यानंतर ते म्हणाले की, नेहरूंच्या चुकांमुळे भारताने हजारो किलोमीटरची भूमी गमावली आहे. पण आता मोदी सरकार पाकव्याप्त भाग, पाकव्याप्त लडाख, आणि चीनव्याप्त लडाख प्रदेश परत आणण्यासाठी वचनबद्ध आहे. हे काम नरेंद्र मोदी सरकारच्या काळातच पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
 
दरम्यान, तुषार मेहता म्हणाले की, कलम ३७० हटवणे आधी अशक्य वाटत होते, पण मोदी सरकारने ते करून दाखवले. आता कोणताही पक्ष त्याच्या पुनर्संचयनाबाबत बोलत नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचाही दाखला दिला. ते म्हणाले की, (POJK) हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही त्यासाठी आपले प्राणही देऊ, मेहता म्हणाले की, आज पाकिस्तान आर्थिक संकटात आहे. (POJK) चे लोक भारतात सामील होण्यास तयार आहेत. यावेळी त्यांनी आपण आझाद काश्मीर सारखी नावे काढून टाकत त्याऐवजी (POJK) असे नाव द्यावे, असे ते म्हणाले.