मुस्लिमबहुल भागात ‘आप’च्या अदील अहमदचा दारूण पराभव
२०२० मध्ये दंगलीप्रकरणात हिंदूंना मोठा फटका
08-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये आम आदमी पक्षाचा दारूण पराभव करण्यात आला. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना बोजा बिस्तारा उचलावा लागला आहे. आपच्या सत्तेची १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निवडणुकीत मुस्तफाबाद मतदारसंघातून मुस्लिमबहुल भागामध्ये भाजपच्या उमेदवाराने पक्षाला विजय मिळवून दिला. मुस्ताफाबादमध्ये भाजपचे उमेदवार मोहन सिंग बिश्त यांनी आम आदमी पक्ष, एमआयएम आणि काँग्रेसचा पराभव केला होता.
मोहनसिंग बिश्त यांनी मुस्ताफाबाद मतदारसंघातून आपचे अदील अहमद यांचा पराभव झाला. मोहनसिंग बिश्त यांना ८५ हजारांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यांनी आदिल अहमद यांचा १७ हजार मतांनी पराभव केला असल्याचे सांगण्यात येते. या मतदारसंघात एमआयएमने दिल्लीतील दंगलीचा मास्टरमाईंड ताहिर हुसैन यांना तिकीट दिले होते.
ताहिर हुसैन यांना ३३ हजार मते मिळाली आहेत. तर या जागेवर काँग्रेसला ११ हजार ७६३ मते मिळाली आहेत. मुस्ताफाबाद विधानसभा निवडणुकीमध्ये मतमोजणीच्या फेरीमध्ये मोहनसिंग बिश्त पुढे निघून गेले. २०२० मध्ये दंगलीप्रकरणात हिंदूंना मोठा फटका बसला असल्याचे सांगण्यात येत आहे.