मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील उसाच्या शेतात सापडलेल्या वाघाटीच्या तीन पिल्लांना मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात आले आहे (rusty spotted cat). राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन आणि संवर्धन केंद्रात ही तीन पिल्लं सोमवार दि. ३ जानेवारी रोजी दाखल झाली (rusty spotted cat). या केंद्रात दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या वाघाटींच्या वाढीसाठी उद्यानातर्फे 'वाघाटी प्रजनन प्रकल्प' राबविण्यात येत आहे (rusty spotted cat). त्याअंतर्गत ही पिल्ले याठिकाणी आणण्यात येणार असून त्यांच्या आगमनाने प्रजनन प्रकल्पातील वाघाटींची संख्या ११ झाली आहे (rusty spotted cat).
गेल्या आठवड्यात हातकणंगले गावातील जांभळी गावातील उसाच्या शेतात वाघाटीची तीन पिल्ले आढळून आली. ऊस कापणीवेळी कामगारांना ही पिल्ले मिळाली. मांजरीची पिल्ले समजून ऊसतोड कामगार ही पिल्ले घरी घेऊन गेले. वन विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच ही पिल्ले ताब्यात घेतली. काही दिवस ही पिल्ले मानवी हस्तक्षेपात राहिली. त्यामुळे पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याची शक्यता धूसर झाली. तरी देखील कोल्हापूरच्या शिर्घ बचाव कृती दलाअंतर्गत या पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी सापडलेल्या ठिकाणीच या पिल्लांना चार दिवस ठेवण्यात आले. मात्र, आई न आल्याने अखेरीस या पिल्लांना 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मार्जार कुळात समावेश असणाऱ्या 'वाघाटी'ला जंगलातील सर्वात लहान आकाराचे मांजर म्हणून ओळखले जाते. या प्रजातीच्या वाढीकरिता २०१३ पासून नॅशनल पार्क प्रशासनाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत 'वाघाटी'चा पिंजराबंद प्रजननाचा प्रयत्न केला जात आहे. अशा पद्धतीचा देशातील हा पहिलाच आणि जगातील दुसरा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सुसज्ज असे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. सद्यपरिस्थिती या केंद्रात ही तीन पिल्लं धरुन ११ वाघाटी आहेत. त्यामधील दोन प्रौढ वाघाटी आहेत. २०१७ साली त्यांना पुण्याहून आणण्यात आले होते. केंद्रात असलेल्या इतर वाघाटी या निमवयस्क आहेत. त्या प्रजननास सक्षम झाल्यावरच प्रजनन केंद्रास चालना मिळेल.
वाघाटीची वैशिष्टय़े
* जंगलातील सर्वात लहान मांजराची प्रजात
* मांसभक्षी असून हा प्राणी निशाचर आहे.
* १४ ते १७ इंच रुंद असून सुमारे दीड किलो वजन
* ७० दिवसांचा प्रजननाचा कालावधी