उबाठा गटाची गळती कायम! कोल्हापूर जिल्ह्यात माजी आमदाराने सोडली ठाकरेंची साथ

    27-Feb-2025
Total Views |
 
Shivsena
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीनंतर उबाठा गटाला लागलेली गळती अजूनही कायम असून आता कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराने त्यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातील उबाठा गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासोबतच मनसेचे हातकणंगले जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
 
हे वाचलंत का? -  पुणे अत्याचार घटनेतील आरोपीला फासावर लटकवणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया
 
दरम्यान, त्यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असल्याचे मत याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.