मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mananiya Shantakka on Panchaparivartan) "विश्वकल्याणाची आकांक्षा उराशी बाळगणारी हिंदू जीवनशैली आचरणाची बाब आहे, म्हणून आपण सर्वांनी ती आपल्या जीवनात आत्मसात केली पाहिजे. आपले राष्ट्र वैभवशाली बनवायचे असेल तर आपल्याला पंचपरिवर्तनाचे विषय वैयक्तिक जीवनात आणि आचरणात आणून समाजापर्यंत पोहोचवावे लागतील.", असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांनी केले.
समितिच्या प्रमुख कार्यवाहिका सीताक्का यांनी बैठकीत संस्थेची सद्यस्थिती, संपन्न झालेले विशेष कार्यक्रम आणि भविष्यातील नियोजित कार्यांची तसेच योजनांची माहिती दिली. त्यासाठी दर्जेदार काम वाढवावे लागेल, असे त्या म्हणाल्या. तसेच संत नामदेवांचे ६७५ वे स्मृती वर्ष, राणी दुर्गावती यांची ५०१ वी जयंती आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती लक्षात घेऊन या सर्वांचे प्रेरणादायी जीवन चरित्र लोकांसमोर मांडायचे आहे आणि त्यांचे विचार आपल्या जीवनातही अंगीकारायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरात १७९९ सेवाकार्ये
या बैठकीत ३४ प्रांतातील १०८ प्रतिनिधी उपस्थित होते. सेविका समितीच्या ४१२५ शाखा देशातील सर्व १२ प्रदेश आणि ३८ प्रांतांमध्ये कार्यरत आहेत. एकूण १०४२ जिल्ह्यांपैकी ८३४ जिल्ह्यांमध्ये समितीचे काम आहे. देशभरात समितीच्या महिला कार्यकर्त्यांमार्फत १७९९ सेवाकार्ये चालवली जात आहेत.