अजमेर दर्ग्यात महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा होणार?

    24-Feb-2025
Total Views |

Lord Shiv Puja at Ajmer Dargah on Mahashivratri

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ajmer Dargah Mahashivratri)
राजस्थानमधील अजमेर दर्गाह शरीफ गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अजमेर दर्ग्यातील संकट मोचन मंदिरात पूजा करण्याची मागणी येथील हिंदू सेनेच्या वतीने नुकतीच करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्राद्वारे हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दावा केला की, या ठिकाणी एक प्राचीन शिवमंदिर आहे, जिथे शतकानुशतके भगवान शिवाची पूजा केली जाते.

हे वाचलंत का? :  राष्ट्रसमृद्धीसाठी पंचपरिवर्तनाचे प्रश्न समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक : माननीय शांताक्का

पत्रात पुढे असेही म्हटले आहे की, हिंदू मंदिरे पाडून अजमेर दर्गा बांधण्यात आला आहे. पुराव्यांनुसार, दर्गा संकुलाच्या खाली एक प्राचीन शिवमंदिर आहे, जिथे शतकानुशतके शिवाची पूजा केली जात आहे. पूजा करणाऱ्या ब्राह्मणांचा त्याकाळी घरियाली म्हणून उल्लेख व्हायचा. मंदिराच्या गर्भगृहातील भिंतीवर शिवाची मूर्ती कोरलेली आहे, जी आजही आहे. महाशिवरात्री सण वर्षातून एकदाच येतो, हा सण प्रामुख्याने हिंदूच साजरा करतात. हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी.
 
दर्ग्याऐवजी मंदिर असल्याच्या पुराव्याचा उल्लेख
अजमेर दर्ग्याच्या जागी मंदिर असल्याच्या पुराव्याचा उल्लेख पत्राद्वारे करण्यात आला, ज्यामध्ये दर्गा संकुलात सध्या असलेल्या ७५ फूट उंच दरवाजाच्या बांधकामात मंदिराच्या ढिगाऱ्याच्या खुणा असल्याचा दावा करण्यात आला आहे. तेथे तळघर किंवा गर्भगृह असल्याचीही चर्चा होती आणि तेथे एक शिवलिंग असल्याचे सांगितले जाते, जिथे ब्राह्मण कुटुंबे पूजा करत असत.