"तथ्य लवकरच बाहेर येईल", USAID संबंधित प्रकरणावर जयशंकर यांचे विधान

    23-Feb-2025
Total Views |
 
USAID
 
नवी दिल्ली : भारतातील निवडणुकांमध्ये USAID ने भारताला मतदानाच्या वाढीसाठी २१ दशलक्ष डॉलर्सचे वाटप केल्याचे वक्तव्य अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी शनिवारी या विधानातील तथ्ये लवकरच बाहेर येतील असा दावा केला आहे. 
 
दिल्ली विद्यापीठ साहित्य महोत्सवात बोलत असताना जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी USAID ने भारताला २१ दशलक्ष डॉलर्स दिल्याचा दावा केला होता. यानंतर या परिस्थितीवर चिंताजनक भाष्य करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी प्रश्न उपस्थित केला की, देण्यात आलेला निधी हा दुसऱ्या पक्षाला निवडून आणण्यासाठी होता का? असा प्रश्न करण्यात आला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे संयोजक संजीव सान्याल यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना जयशंकर यांनी मान्य केले की, USAID ला भारतात चांगला उपक्रम राबवण्यासाठी परवानगी देण्यात आली.
 
अशातच मंत्र्यांनी नमूद केले की, अमेरिकेतून सूचना येत आहेत की, अशी काही कृत्य वाईट हेतूने सुरू आहेत. गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी मियामीमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी संबोधित केले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मतदारांच्या मतदानासाठी USAID च्या २१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच असा प्रश्न विचारण्यात आला की ते दुसऱ्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत का? देशातील काही उपक्रमांसाठी USAID निधी देण्याबाबतचे खुलासे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेपाची चिंता निर्माण झाली आहे, असे भारताने शुक्रवारी म्हटले आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या साप्ताहिक ब्रीफिंगदरम्यान माध्यमाने एक प्रश्न केला तेव्हा त्याला उत्तरत जयशंकर म्हणाले की, संबंधित विभाग आणि एजन्सी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तसेच अमेरिकेच्या प्रशासनाने काही अमेरिकन कारवाया आणि निधीबाबत जी माहिती दिली. ती माहिती चिंताजनक असल्याचा दावा जयशंकर यांनी केला.