मुंबई, दि.२२ : प्रतिनिधी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भूमिगत मेट्रो ३ प्रकल्पाच्या बीकेसी - कुलाबा या दुसऱ्या टप्प्याचे आतापर्यन्त ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२५ अखेर प्रवासी सेवेसाठी ते सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अशावेळी कुलाबा ते आरे या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर ही मार्गिका सर्वसामान्यांना प्रवाशांच्या पसंतीस पडत असल्याचे प्रवासी आकडेवारीतून दिसून येते. उदघाटन झाल्यापासून ते २० फेब्रुवारी याकाळात या मार्गावरून २६ लाख ६३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहर आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मेट्रो ३ या भूमिगत मार्गिकेच्या कामाला प्रारंभ झाला. ऑक्टोबर २०२४ला मुंबईकरांची या मेट्रोची प्रतीक्षा संपली आणि आरे ते बीकेसीपर्यंत पहिल्या टप्प्यात या भुयारी मार्गातून प्रवासाला सुरुवात झाली. या मेट्रो मार्गिकेमुळे पश्चिम उपनगरातील प्रवास आणखी सुखकर झाला आहे. या नव्या मार्गिकेवरील मेट्रो गाड्या आरे जेव्हीएलआर स्थानकापासून सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, सीएसएमआयए टी-२, सहार रोड, सीएसएमआयए टी-१, सांताक्रुझ, बांद्रा कॉलनी या भागांतून पुढे बीकेसीपर्यंत धावणार आहेत.
दुसरा टप्पा मार्च २०२५मध्ये सुरू होण्याची अपेक्षा
मुंबई मेट्रो मार्गाची म्हणजे एक्वालाइनची एकूण लांबी ३३.५ किलोमीटर असून या मार्गावर एकूण २७ स्थानके आहेत. यापैकी १२.६९किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४मध्ये केले होते. या मार्गाचा आणखी एक भाग मार्चमध्ये सुरू होणार आहे. हा मार्ग बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत आहे. आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो गेल्याने बीकेसी ते वरळी दरम्यान मेट्रोची जोडणी होणार आहे.
ऑक्टोबर २०२४ ते २० फेब्रुवारी २०२४ प्रवासी आकडेवारी
एकूण प्रवासी संख्या २६,६३,३७९
एकूण फेऱ्या २९,१६२
वक्तशीरपणा ९९.६० %