इस्रायलच्या तेल अवीव शहरात तीन बस वाहन जळून खाक

देशभरातील वाहतूक सेवा ठप्प: हमासकडून हल्ल्याची जबाबदारी

    21-Feb-2025
Total Views |
 
हमास-इस्रायल युद्ध
 
जेरूसलम : इस्रायलच्या (Israel) तेल अवीव शहरात तीन बस वाहनांमध्ये स्फोट झाला असल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हे स्फोट बात याम परिसरात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत कोणतीही एक जिवीतहानी झाली नाही. पोलिसांनी या हल्ल्याला दहशतवादी कट असल्याचे म्हटले आहे. या संबंधित स्फोटानंतर काही वेळानंतर इस्रायलने काही बँकेतील काही अड्ड्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
 
या संबंधित घटनेनंतर वाहतूक मंत्री मिरी रेगेव्ह यांनी सर्व सार्वजनिक वाहतुकीवर सुरक्षा तपासणीला परवागनी देण्यास देशभरातील बस, रेल्वे तात्पुरत्या थांबण्यासाठी सहकार्य करण्यात आले.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका बस वाहनाला आग लागली होती. तसेच नजीकच उभी असलेली एक कारही जळत असल्याचे दिसून आले. तेल अवीव जिल्हा पोलीस प्रमुख हैम सरगारोव्ह म्हणाले की, टायमरशी जोडण्यात आलेली स्फोटकं उपकरणांद्वारे स्फोट घडवून आणतील.
 
काही अहवालानुसार, या बॉम्बवर बदला घेण्याबाबत धमकी लिहिण्यात आली होती. हमासच्या तुळकरम बटालियनशी जोडण्यात आलेल्या एका टेलिग्राम चॅनेलने या हल्ल्याबाबत बदलाची एक कृती असे वर्णन केले. त्याने त्याची जबाबदारी घेतली आहे.
 
 
 
दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधान बेजामिन नेतान्याहू यांनी या प्रकरणाची माहिती घेतली आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. संरक्षण मंत्री योव गॅलेट यांनी लष्कराला वेस्ट बँकेत त्यांच्या हालचाली वाढवण्याचे आदेश दिले. इस्रायली पोलीसांनी गुप्तचर संस्था शिन बेट या हल्ल्याचा तपास करत आहेत. संशयितांना शोध घेण्यासाठी मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.
 
इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविरामाची सध्या चर्चा आहे. मात्र. अशातच हा हल्ला झाला आहे. आतापर्यंत हमासने १९ इस्रायलच्या बांधवांना सोडवले. तर १ हजार १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांना त्या बदल्यात सोडवण्यात आले. या संबंधित हल्ल्यानंतर जगाचे इस्रायलच्या प्रतिक्रियेवर लक्ष लागलेले आहे.