कोकणात कालवे पालनाला 'केरळ'चा आधार; नव्या पद्धतीमुळे उत्पादन वाढणार

    21-Feb-2025
Total Views |
Maharashtra tribal farmers



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
वन विभागाच्या 'कांदळवन प्रतिष्ठान'कडून कोकणात राबविण्यात येणाऱ्या कालवे पालन प्रकल्पासाठी 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'ने (सीएमएफआरआय) गुणवत्ता पूर्ण कालवे बीजांचा पुरवठा केला आहे (Maharashtra tribal farmers). कालव पालन प्रकल्पातील उत्पादन क्षमता वाढवून स्थानिकांना अधिकाधिक रोजगार मिळावा म्हणून केरळमधील 'सीएमएफआर'च्या कालवे बीच निर्माण केंद्रामधून १ लाख बीजांचा पुरवठा करण्यात आला आहे (Maharashtra tribal farmers). हे बीज लवकरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील कालवे पालन प्रकल्पामध्ये पाठवले जाईल. (Maharashtra tribal farmers)
 
 
महाराष्ट्र शासनाने २० सप्टेंबर २०१७ पासून महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये ‘कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण’ ही योजना सुरू केली. 'कांदळवन कक्षा'च्या 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'अंतर्गत ही योजना गावांमध्ये तयार केलेल्या 'कांदळवन सह-व्यवस्थापन समिती'च्या मार्फत राबवली जाते. याअंतर्गत कालवे पालन, खेकडे पालन, शिणाना शेती अशा प्रकारचे रोजगारभिमुख प्रकल्प राबवले जातात. उपहारगृह व्यवसायामधून कालव्यांना मोठी मागणी आहे. कालवे पालन प्रकल्पामध्ये दोरीवर कालव्यांची रिकामी कवच लावून ती खाडीतील पाण्यामध्ये सोडली जातात. अशा वेळी खाडीमधील नैसर्गिक अधिवासातील कालव्याचे बीज हे त्यावर येऊन चिकटते आणि त्यांची वाढ होते. मात्र, गेल्या काही वर्षात लांबलेला पाऊस, खाडीतील बिजाची गुणवत्ता याचा परिणाम कालव्यांचा वाढीवर झाला आहे. परिणामी उत्पादन कमी झाल्यावर त्याचा फटका रोजगारावर देखील पडला आहे. या परिणामावर उपाय म्हणून 'कांदळवन प्रतिष्ठान'ने 'सीएमएफआरआय'सोबत कालवे बीज उपलब्ध करुन देण्यासाठी करार केला आहे. या कराराअतंर्गत एक लाख 'ऑयस्टर स्पॅट्स'ची पुरवठा 'सीएमएफआरआय'कडून करण्यात आला आहे.
 
 
यासाठी 'सीएमएफआरआय'ने पहिल्या टप्प्यात केरळच्या अष्टमुडी तलावातून गोळा केलेल्या ब्रूडस्टॉकचा वापर करून बीज निर्मिती केंद्रात भारतीय बॅकवॉटर ऑयस्टर प्रजातीच्या डी-आकाराच्या लाखो बीजांचे (अळ्यांचे) संगोपन केले. त्यानंतर, शास्त्रज्ञांनी या अळ्यांचे संगोपन कालव्यांच्या कवचांवर केले. 'सीएमएफआरआय'ने एकल कालवे कवचावर वाढलेले बीज आणि कठीण कवचावर वाढलेले बीज कोकणात पाठवले आहेत. यामधील एकल कालवे कवचाला मोठी मागणी आहे. नैसर्गिक बीजांच्या हॅचरीद्वारे उत्पादित कालवे बीज अनेक फायदे देतात. कारण ते अधिक जगतात, ते रोगमुक्त असतात आणि त्यांचा आकार एकसमान असतो. ज्यामुळे चांगले उत्पादन मिळते.