कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास! आमदारकी जाणार? नेमकं प्रकरण काय?
20-Feb-2025
Total Views |
नाशिक : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
१९९५ मध्ये माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सदनिकांच्या घोटाळ्यासंबंधी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. नाशिक जिल्हा न्यायालयाने आता कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूकीच्या प्रकरणावर त्यांना शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत.
या प्रकरणात माणिकराव कोकाटे वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू, इथेही त्यांना दिलासा मिळाला नाही तर माणिकराव कोकाटे यांनी आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.