मंत्री धनंजय मुंडेंना Bell's palsy आजार! म्हणाले, मला सलग दोन मिनिटेही...

    20-Feb-2025
Total Views | 67
 
Dhananjay Munde eye desease
 
मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांना Bell's palsy या आजाराचे निदान झाले असून सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठक तसेच जनता दरबारला उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत या आजाराची माहिती दिली.
 
हे वाचलंत का? -  कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर! सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत
 
ते म्हणाले की, "माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनीविशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell's palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही," असे त्यांनी सांगितले.
 
तसेच याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल," असेती धनंजय म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा