'ऑपरेशन डेव्हिल हंट'च्या नावाखाली सूड उगवायचे गोरख धंदे; काय आहे युनूस सरकारची ही नवी मोहीम?

    18-Feb-2025
Total Views |

Operation Devil Hunt Bangladesh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Operation Devil Hunt Bangladesh) 
बांगलादेशात सत्तापालट करून सत्तेत आलेले युनूस सरकार सातत्याने येथील अल्पसंख्याक नागरिकांवर दडपशाहीचे चक्र चालवत आहेत. इतकेच नव्हे तर, युनूस सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या 'अवामी लीग'ला जणू नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. अवामी लीगचे कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक करण्यासाठी युनूस सरकारकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. 'ऑपरेशन डेव्हिल हंट' या नावाची ती मोहीम असून आतापर्यंत ४७९० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. यातील बहुतांश लोक अवामी लीग आणि तत्सम संघटनांशी संबंधित आहेत.

हे वाचलंत का? : 'येमेनी' घुसखोर, ९ वर्ष मदरशात आसरा; अमेरिकेच्या धरतीवर भारतही कठोर भूमिका घेणार?

अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गैरकृत्यांचा पर्दाफाश करू नये, या उद्देशाने युनूस सरकारने त्यांना पकडण्यासाठी देशभरात लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दल तैनात केले आहे. मोहम्मद युनूस यांच्या सरकारने गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी ही मोहीम सुरू केल्याचा दावा केला आहे. अवामी लीगचे सामान्य कार्यकर्तेच नव्हे तर माजी खासदार आणि मंत्रीही टार्गेटवर आहेत. आत्तापर्यंत मोहम्मद युनूसच्या सरकारने वेगवेगळ्या प्रकरणात सुमारे शेकडो अवामी लीग खासदार आणि माजी मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकले आहे.

देशातील कथित गुन्हेगारांना पकडणाऱ्या युनूस सरकारला दिवसाढवळ्या शेख हसीनाचे घर पाडणाऱ्या एकाही कट्टरपंथीला अटक करता आलेली नाही. जुलै-ऑगस्ट दरम्यान बांगलादेशातील हिंसाचार रोखण्यासाठी काम करणारे १०५९ पोलीस आता युनूस सरकारच्या निशाण्यावर आहेत. युनूस सरकार त्यांना अटक करत आहे. ४१ जणांना अटकही करण्यात आल्याची माहिती सुद्धा आहे. अटक केवळ उच्च पोलीस अधिकाऱ्यांपुरती मर्यादित नाही, तर शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात बांगलादेशातील मोठ्या शहरांचे पोलीस आयुक्त असलेल्या बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. युनूस सरकार इस्लामिक कट्टरपंथींवर कारवाई करत त्यांच्यावर सूड उगवत असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.