इस्लाम हा अरबस्तानचा धर्म इथे सर्वच हिंदू होते - आयएएस अधिकारी नियाज खान
17-Feb-2025
Total Views |
भोपाळ : मध्य प्रदेश कॅरेडरचे आयएएस अधिकारी नियाज खान यांनी म्हटले आहे की, इस्लाम धर्म हा अरब धर्म आहे. भारतातील प्रत्येकजण मूळत: हिंदू असल्याचे प्रतिपादन केले आहे. नियाज खान म्हणाले की, दुसऱ्या धर्मात धर्मांतर केल्याने आपली मूळ ओळख बदलत नाही. तसेच सामायिक सांस्कृतिक आणि अनुवंशिक वारसा समजावून सांगणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
त्यांनी सोशल मीडियावरील एक्स या प्लॅटफॉर्मवर लिहिले की, इस्लाम हा अरबस्तानचा धर्म आहे. इथे सर्वच हिंदू होते. हिंदू लोकांचे मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आले. म्हणून धर्म वेगवेगळे असले तरीही रक्त एकच असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. सर्वकाही एकाच संस्कृतीचा भाग राहिलेला आहे. जर मुस्लिम लोक अरबांना आदर्श मानत असतील तर त्यांनी यावर विचार करावा. सर्वप्रथम, हिंदूंना आपले माना आणि त्यानंतर अरबांना प्राधान्य द्या.
इस्लाम तो अरब का धर्म है। यहां तो सभी हिंदू थे। हिंदू से लोग मुस्लिम बनाए गए थे। इसलिए भले ही धर्म अलग अलग हों लहू तो एक है। सभी एक संस्कृति का हिस्सा रहे हैं। अगर जो मुस्लिम अरब के लोगों को आदर्श मानते हैं वे पुनर्विचार करें। सर्वप्रथम हिंदुओं को अपना भाई माने बाद में अरब को।
नियाज खान म्हणाले की, इस्लामचा मूळ उगम अरबस्थानातला आहे. कालानंतराने ते मलेशिया, इंडोनेशियासोबतच ५७ हून अधिक देशांमध्ये पसरला गेला. त्यांनी सांगितले की, जर भारतीय मुस्लिमांच्या रक्तांची चाचणी केली तर ते सौदी, अरेबिया, इराण आणि इराकमधील नसून ते भारतीय हिंदूंप्रमाणेच आहेत.