दहशतवादी विरोधी पथकाने मुंबईमधून ३ बांगलादेशी घुसखोरांच्या आवळल्या मुसक्या
17-Feb-2025
Total Views | 7
रायपूर : छत्तीसगड राज्यातील रायपूर पोलीस आणि एटीएसने रायपूरमध्ये अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. हे बांगलादेशी बनावट कागदपत्रांच्या मदतीने बगदादकडे पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. दहशतवादी विरोधी पथकाने तिघांनाही मुंबई विमानतळावरून ताब्यात घेत अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही बांगलादेशी घुसखोर बऱ्याच काळापासून रायपूरमधील ताजनगर, मिश्राबाडा, टिकरापाडामध्ये वास्तव्यास होते. अटक करण्यात आलेल्या घुसखोरांमध्ये मोहम्मद इस्माईल, शेख अकबर आणि शेख साजन अशी न्यायालयाने तिन्ही घुसखोरांना ३ दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आले.
रायपूर पोलिसांनी आणि एटीएसने तीन बांगलादेशी घुसखोरांकडून भारतीय पासपोर्ट, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि बगदाद व्हिसा जप्त करण्यात आला. पोलीसांनी आणि एटीएस पथकाने बनावट कागदपत्र बनवण्यासाठी ज्यांचा सहभागल होता त्याची माहिती गोळा केली.
या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी तापस केला असता, तपासातून समोर आले की, तीन बांगलादेशी घुसखोर २६ जानेवारी रोजी हावडा मुंबई मेलने रायपूरहून मुंबईमध्ये पोहोचले होते. त्यानंतर ते मुंबईहून ८ फेब्रुवारी तिघंही इराकच्या बगदादकडे जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले होते. मात्र या प्रकरणाची माहिती पोलीस आणि एटीएस विभागाच्या हाती आली. त्यानंतर तिघांनाही मुंबईच्या विंमानतळावरून मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.