रिक्षा चालकाने अल्पवयीन शाळकरी युवतीवर केले अमानुष अत्याचार
गळा दाबत केली हत्या
13-Feb-2025
Total Views | 72
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताजवळ न्यू टाउनमध्ये एका ई-रिक्षा चालकाने १४ वर्षांच्या शाळकरी विद्यार्थीनीवर अमानुष अत्याचार केले आहेत. त्याने मुलीचा गळा दाबत हत्या करण्यात आली. नंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार करण्यात आला. ती मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी ई-चालक सौमित्र रॉय यांना अटक केली आहे. आरोपींने सांगितले की, गुन्हा करण्याआधी त्याने मुलीला ई-ऑटेमध्ये सुमारे ३ तास फिरवण्यात आले.
तपादासरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपीने युवतीला घरी सोडण्याच्या बहाण्याने ई-ऑटोमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर जंगलात घेऊन गेला आणि तिथे त्याने युवतीला फळ देऊन शांत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा युवती ओरडू लागली तेव्हा त्याने तिचा गळा दाबत खून केला. त्यावेळी हल्लेखोराने मानेचे हाड मोडल्याची माहिती प्रसारमाध्यमाने दिली. यानंतर युवतीचे शारीरिक शोषण करण्यात आले.
दरम्यान, बलात्कारानंतर आरोपी सौमित्र रॉयने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एका पोत्यात भरण्यात आला. त्यानंतर मृतदेह असलेलं पोतं एका नाल्यामध्ये फेकण्यात आले. आरोपी पुरूष हा विवाहीत असून त्यांचे दोन विवाह झाल्याचे तपादरम्यान समोर आले आहे. आरोपीनेही त्याच्या पहिल्या पत्नीला त्रास दिला होता. त्या त्रासाने तिने आत्महत्या केली.