व्यक्तीला बदनाम करून राजीनामे घेण्याची काँग्रेसची प्रथा चुकीची! खासदार अशोक चव्हाण यांचे मत

    11-Feb-2025
Total Views |
 
Ashok Chavan
 
नांदेड : कुठल्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामे घेण्याची काँग्रेसची प्रथा चुकीची आहे, असे मत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.
 
अशोक चव्हाण म्हणाले की, "काँग्रेसमध्ये राजीनामे घेण्याची प्रथा चुकीची आहे, असे माझे व्यक्तिगत मत आहे. काँग्रेसच्या काळात कुठल्या आधारावर राजीनामे घेतले गेले? विनाकारण कुठल्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामे घेणे चुकीचे आहे. दोषी असताना जरुर कारवाई करा. पण राजकारणापोटी कुणालाही बदनाम करण्यासाठी राजीनामा घेण्याचे सत्र हे काँग्रेसच्या काळात होते. ते फार चुकीचे आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  वैभव नाईकांच्या भोवती चौकशीचा फेरा! पत्नीसह एसीबी कार्यालयात रवाना
 
ते पुढे म्हणाले की, "आरोप प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग आहे. परंतू, केवळ आरोपांच्या आधारावर तत्कालिन काँग्रेसच्या काळात घेतलेले राजीनामे चुकीचे आहे. त्यावेळी राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम झालेला आहे," अशी टीकाही अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर केली आहे.
 
एकीकडे बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. अशातच खासदार अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याबाबत आपले मत व्यक्त केले.