मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी 'आप'ला खिंडार

एकाचवेळी ७ आमदरांचा पक्षाला अखेरचा राम राम

    31-Jan-2025
Total Views |
 
 Delhi Assembly election
 
नवी दिल्ली  (Delhi Assembly election) : दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला खिंडार पडले आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. कारण आपच्या सात नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखेरचा राम राम केला आहे. राजीनाम्यात त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, कस्तुरबा नगरचे आमदार मदनलाल, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी आणि पालममधील भावना गौर यांचाही यामध्ये समावेश आहे.
 
बिजवासनचे आमदार भूपिंदर सिंग जून,आदर्श नगरचे आमदार पवन कुमार शर्मा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षाने या आमदारांना दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ च्या निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले नसल्याने नेत्यांमध्ये नाराजी नाट्य निर्माण झाले. यामुळे ते पक्षातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. राजीनामा दिलेल्या सूत्रांच्या सदस्यांनी शुक्रवारी ३१ डिसेंबर २०२५ रोजी माहिती दिली आहे.
 
 
 
मेहारोलीचे आमदार नरेश यादव यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या यादव यांनीही राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. काही आरोप हे खरे ठरल्यानंतर यादव यांनी आपल्या स्वेच्छेने त्यांचे तिकीट परत दिले आणि माघार घेतली आहे. त्यानंतर 'आप'ने महरेली मतदारसंघामध्ये दुसरा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र

पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र

मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच ..

एआयच्या मदतीने जनसंपर्कातील कामे प्रभावीपणे करा : ब्रिजेश सिंह`पीआरएसआय`च्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिवस उत्साहात साजरा

एआयच्या मदतीने जनसंपर्कातील कामे प्रभावीपणे करा : ब्रिजेश सिंह`पीआरएसआय`च्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिवस उत्साहात साजरा

``आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुध्दिमत्ता हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. जनसंपर्क क्षेत्र हे विश्वासावर चालते. कृत्रिम बुध्दिमत्ता आणि चॅटजीपीटी आदीसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे. एआय, चॅटजीपीटी, कॅनव्हा आदी सगळी साधने आहेत, याचा वापर योग्यरित्या करायला शिका. या साधनांचा उपयोग करून जनसंपर्क क्षेत्रातील कामे अधिक चांगली आणि प्रभावीपणे करावीत``, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121