जळगावात रेल्वेचा भीषण अपघात, मृतांच्या संख्येचा आकडा आला समोर
22-Jan-2025
Total Views |
जळगाव : जळगावातील परांडा रेल्वेस्थानकावर रेल्वे अपघाताची (Railway Accident) घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरली होती. या भीतीने अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू कर्नाटक रेल्वेने पुष्पक रेल्वेला धडक दिली. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही घटना दि : २२ जानेवारी २०२५ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रासारमाध्यमानुसार मिळालेली माहिती, पुष्पक एक्सप्रेस रेल्वेतून ठिणग्या उडाल्याने धूर निघू लागला होता. त्यामुळे एक्स्प्रेसला आग लागल्याचा काही प्रवाशांचा गैरसमज झाला होता. त्यामुळे काही प्रवाशांनी भीतीपोटी रेल्वे ट्रॅकवरून उड्या मारल्या होत्या. तेव्हा विरूद्ध दिशेने येणाऱ्या बंगळुरू कर्नाटक एक्स्प्रेसने पुष्पक रेल्वेगाडीस धडक दिली. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे.
जळगावातील परांडा रेल्वेस्थानकाजवळ असणाऱ्या गावानजीक ही घटना घडली होती. त्यावेळी रेल्वेरुळ ओलांडत असताना ही दुर्घटना झाली असे घटनास्थळी असलेल्या स्थानिकांचे म्हणणे आहे, तर काही प्रवाशांनी आग लागल्याची अफवेमुळे लोकांनी उड्या मारल्या असल्याचे सांगितले आहे. तसेच याचपार्श्वभूमी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे.
रेल्वे अपघातावर गुलाबराव पाटील यांचे भाष्य
घडलेल्या घटनेस्थळी प्रांत अधिकाऱी आणि कलेक्टरने धाव घेतली. यावेळी एका वृत्तवाहिनीला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी दाखल व्हायला ३० मिनिटांचा वेळ लागतो. मात्र जोवर घटनास्थळी कोणीही जाणार नाही तोवर घडलेली घटना लक्षात येणार नाही, असे ते म्हणाले.