दावोसमध्ये महाराष्ट्राचा विक्रम! पहिल्याच दिवशी ६,२५,४५७ कोटींचे करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी

    22-Jan-2025
Total Views | 107
 
Davos
 
दावोस : दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने विक्रम केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले.
 
मंगळवार, २२ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. तसेच त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. दरम्यान, टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली असून मुख्यमंत्र्यांनी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित करत महाराष्ट्रातही विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे.
 
यासोबतच रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५ हजार मेवॉ पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली. शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच त्यांनी केले.
 
मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत त्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीदेखील भेट घेतली. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121