न्या. आलोक आराधे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती!
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
22-Jan-2025
Total Views | 49
मुंबई : तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांनी मंगळवार, २२ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवन येथे हा शपथविधी समारंभ पार पडला.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्या. आलोक आराधे यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली.