अकोला जिल्हात बांगलादेशी, रोहिंग्याचे थैमान! तब्बल १५ हजार ८४५ लोकांना जन्म दाखल्यांचे वाटप
22-Jan-2025
Total Views |
अकोला : बाांग्लादेशी आणि रोहिंग्यांना देण्यात आलेल्या जन्म दाखला घोटाळ्याचे प्रकरण आता अकोल्यापर्यंत पोहोचले आहे. अकोला जिल्ह्यात १५ हजार ८४५ बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
अकोला जिल्हात 15,845 बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जन्म दाखला घोटाळ्याचा प्रकार समोर आणला असून या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्राप्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयामार्फत अहवाल मागवण्यात आला आहे. यात बनावटी दस्तावेजाद्वारे अकोला जिल्ह्यात तब्बल १५ हजार ८४५ जन्माचे दाखले मिळवल्याची माहिती पुढे आली आहे.