मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahakumbh Sant Sammelan) प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभात देशभरातील साधू महंत एकत्रित आले आहेत. गेल्या अनेक कुंभांमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या शिबिरात आयोजित केल्या गेलेल्या संत संमेलनात अयोध्येत रामललाचे भव्य मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा होता. २०१९ च्या कुंभमध्ये राम मंदिर बांधण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. आज राममंदिर निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे. यावर्षी होणाऱ्या संत संमेलनात विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असून वक्फ बोर्ड रद्द करण्याचा मुद्दा अग्रस्थानी असल्याची माहिती मिळत आहे.
हे वाचलंत का? : ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन
विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शन मंडलच्या बैठक दि. २४ जानेवारी रोजी महाकुंभ परिसरातच होणार आहे. सनातनी हितसंबंधांच्या अनेक मुद्द्यांवर बैठकीत विचारमंथन केले जाते. सभेतूनच सनातनी हिताची कामे करण्याचे ठराव घेतले जातात. यावेळीही चर्चेच्या मुद्द्यांमध्ये धर्मांतरण, मंदिरांवरील सरकारी नियंत्रण, ज्ञानवापी-मथुरा असे अनेक राष्ट्रीय मुद्दे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही काळापासून संत-महंतांनी वक्फ बोर्डाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महाकुंभात हा ज्वलंत विषय समोर ठेऊन चर्चा होण्याची शक्यता आहे.
विहिंपचे महाकुंभ परिसरात होणारे जाहीर कार्यक्रम
२५ जानेवारी : साध्वी सम्मेलन
२५, २६ जानेवारी : संत सम्मेलन
२७ जानेवारी : युवा संत सम्मेलन