छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाठा गटाला खिंडार! शहरप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
21-Jan-2025
Total Views |
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाठा गटाला मोठे खिंडार पडले असून मंगळवार, २१ जानेवारी रोजी शहरप्रमुखांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
महसूलमंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, शिरिष बारोळकर, संजय कौडगे आदी उपस्थित होते.