सैफला भेटण्यास बंदी! संसर्गाचा धोका, डॉक्टरांनी दिली माहिती

    18-Jan-2025
Total Views |
 
saif ali khan
 
मुंबई : (Saif Ali Khan Heath Update) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवार, दि. १८ जानेवारीला मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोराने केलेल्या धारदार शस्त्राच्या वारामुळे रक्तबंबाळ झालेल्या सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे.
 
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सैफच्या जखमा खोल असल्याने अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत, त्यामुळे त्याला संसर्गाचा धोका आहे, म्हणून त्याच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर लोकांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. सैफला लवकर बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे. आम्ही त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती सैफवर शस्त्रक्रिया करणारे लीलावती रुग्णालयाचे मुख्य सर्जन डॉ. नितीन डांगेंनी दिली.