Saif Ali Khan Attacked News : पोलीसांची तपासचक्र फिरली! करिनाच्या ‘त्या’ पोस्टची चर्चा
17-Jan-2025
Total Views |
मुंबई : (Saif Ali Khan Attacked) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रयातील घरात १६ जानेवारीला मध्यरात्री चाकू हल्ला झाला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. पोलिसांनी या व्यक्तीला वांद्रे पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. ताब्यात घेतलेला व्यक्ती हा आरोपी नाही, असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी २० पथकांची स्थापना केली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची कसून चौकशी सुरू ठेवली आहे. मुंबईतील सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू ठेवला आहे आणि आरोपींच्या पार्श्वभूमीची तपासणी केली जात आहे. सैफ अली खान यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, करीना कपूरने सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये सैफ अली खानच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तिने लिहिले की ,"हे अतिशय धक्कादायक आणि भीतीदायक आहे. सैफ आणि आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. माझ्या प्रियजनांची सुरक्षा हे माझ्या प्राथमिकतेत आहे आणि आम्ही मुंबई पोलिसांच्या मदतीने हे संकट लवकरच सोडवू." तिने या पोस्टमध्ये अफवा पसरवू नयेत आणि अधिकृत माहितीचीच वाट पाहण्याचेही आवाहन केले आहे.
शर्मिला टागोर त्यांच्या मुलाला सैफला भेटायला लीलावती रुग्णालयात आल्या. शर्मिला या करीना कपूर ला धीर देण्यासाठी करीना सोबत संवाद साधला. त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट नाही. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास सुरू ठेवला असून, संबंधित आरोपींच्या पार्श्वभूमीची तपासणी केली जात आहे. तसेच, त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले आहे.