कुत्र्याचे शेपूट वाकडेच!

    15-Jan-2025   
Total Views |


Mallikarjun Kharge
 
रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या राममंदिर प्राणप्रतिष्ठापनेदिवशी देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, या विधानावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “सरसंघचालकांना देशात फिरणे मुश्किल होईल,” तर राहुल गांधी म्हणाले, “हेच विधान जर सरसंघचालकांनी दुसर्‍या देशात केले असते, तर ते तुरूंगात असते.” खरे तर राहुल गांधी यांच्या बुद्धिमत्तेबद्दल न बोलणेच बरे, तर खर्गे यांची अवघी बुद्धी काया-वाचा-मने राहुल यांच्या चरणी समर्पित! त्यामुळे सरसंघचालकांबाबत अशी विधाने करणार्‍या या दोघांबाबत बोलायचे, तर ‘गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता’ हेच म्हणावे लागेल.

रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या राममंदिर प्राणप्रतिष्ठापनेदिवशी देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, या विधानावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “सरसंघचालकांना देशात फिरणे मुश्किल होईल,” तर राहुल गांधी म्हणाले, “हेच विधान जर सरसंघचालकांनी दुसर्‍या देशात केले असते, तर ते तुरूंगात असते.” खरे तर राहुल गांधी यांच्या बुद्धिमत्तेबद्दल न बोलणेच बरे, तर खर्गे यांची अवघी बुद्धी काया-वाचा-मने राहुल यांच्या चरणी समर्पित! त्यामुळे सरसंघचालकांबाबत अशी विधाने करणार्‍या या दोघांबाबत बोलायचे, तर ‘गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता’ हेच म्हणावे लागेल.
 
सरसंघचालकांचे विधान काय होते, तर “अयोध्येतील प्रभू राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ‘प्रतिष्ठा द्वादशी’ म्हणून साजरी केली जावी. कारण, अनेक शतकांपासून शत्रूंच्या हल्ल्याचा सामना करत असलेल्या आपल्या देशाला खरे स्वातंत्र्य याच दिवशी मिळाले.” आता सरसंघचालकांनी केलेल्या या विधानामध्ये कुठेही देशाचा किंवा संविधानाचा अपमान झाला का? तर नाही, उलट सरसंघचालकांचे म्हणणे 100 टक्के खरे आहे. कारण, 1947 साली देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानाने देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. मात्र, हजारो वर्षे भारतीय धर्मसंस्कृतीवर परकीय आक्रमणांनी हल्ला केला. 500 वर्षे रामललाच्या मूर्तीला तंबूत राहावे लागले. ज्याला धर्म, इतिहास आणि संस्कृतीबद्दल भान आणि प्रेम आहे, त्याच्यासाठी ही जिव्हारी लागणारी अपमानस्पदच घटना होती. त्यामुळे रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणे हा भारताच्या धार्मिकतेचा सन्मान होता. परकीय आक्रांतांच्या जोखड छिन्नविच्छिन्न करून भारतीयांनी धर्म-संस्कृती लढा जिंकला. आमचे प्रभू राम पुन्हा अयोध्येत दिमाखात विराजमान झाले. त्यामुळे धार्मिक संस्कृतीच्या दृष्टीने भारतासाठी हा खरा स्वातंत्र्य दिन आहे. पण, हे स्वातंत्र्य राहुल गांधी आणि त्यांचे प्यादे असलेल्या खर्गेंना कळणारच नाही. कारण, या अशा लोकांनीच तर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाबद्दलही संशय व्यक्त केला होता. त्यामुळेच राहुल गांधी आणि खर्गे यांना भारतीयांनी राजकीय अज्ञातवासात धाडले. यातूनही गांधी, खर्गे यांनी बोध घेतलेला नाही. त्यांच्यात सुधारणाही नाही. यावर काही लोक म्हणतात, सुधारणा होणार कशी? कारण, कुत्र्याचं शेपूट वाकडे अशी एक म्हण आहे म्हण!
 
‘दिल्ली का ठग’ कोण?
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील आणि पंजाबमधील सत्तेचे रहस्य काय? तर प्रत्येक निवडणुकीमध्ये सामान्यांसारखा सामन्य आहे, असा अरविंद केजरीवाल यांनी केलेला दिखावा. प्रत्येक निवडणुकीवेळी कधी त्यांना चापटवण्यात आले, तर कधी त्यांच्यावर शाई, कधी चप्पल फेकून मारण्यात आले. हे सगळे घडले की, मुद्दाम जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी घडवून आणले असेल, हा प्रश्न पडला आहे. कारण, काहीही असू शकते. जे दिसते तेच सत्य आहे, असे म्हणण्याचे दिवस गेले.
 
तर सध्या दिल्लीमध्ये निवडणुकीचे वेध लागले. अरविंद केजरीवाल निवडणुकीमध्ये सहभागी असताना आणि दिल्लीत निवडणूक असताना पुन्हा हीच नाटक पाहायला मिळू शकतात, याची तयारी दिल्लीकरांनी ठेवायलाच हवी. नव्हे गुप्तचर यंत्रणेला म्हणे असे कळले आहे की, अरविंद केजरीवाल यांच्यावर खलिस्तानी दहशतवादी हल्ला करू शकतात. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल आणि खलिस्तानी यांचा मागोवा घेतला तर काय जाणवते? खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत पन्नू याने मागे म्हटले होते की, “अरविंद केजरीवालकडे सत्ता नव्हती, तेव्हा त्यांनी खलिस्तानवाद्यांना न्यूयॉर्कमध्ये वचन दिले होते. जर आम आदमी पक्षाची सत्ता आली, तर 1993 साली दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटचा गुन्हेगार देविंदर पाल सिंह भुल्लर याची तुरूंगातून पाच तासांच्या आत सुटका करू. त्याने दिलेल्या वचनामुळे 2014 तेे 2022 सालापर्यंत केजरीवाल यांना 134 कोटी रुपये (16 अब्ज डॉलर्स) वर्गणी दिली आहे.” यावर आम आदमी पक्षाने काही उत्तर दिले नाही. त्यामुळे खलिस्तानी दहशतवाद्यांसोबत अरविंद केजरीवाल यांचे काय संबंध आहेत, ते वेगळे सांगायला नको. या पार्श्वभूमीवर स्वत:ला ‘आम आदमी’ समजणार्‍या केजरीवालांच्या सुरक्षेसाठी 63 लोक तैनात आहेत. ज्यामध्ये पायलट, एस्कॉर्ट, सुरक्षा दल, होम गार्ड आणि स्पॉटर आहेत. तर अशीही 63 जणांची सुरक्षारक्षकांची फौज बाळगणारे, आरसपाणी महल बांधणारे आणि कोटींच्या वस्तूंनी घर सजवणारे वर दारू घोटाळ्यात अडकलेले अरविंद केजरीवाल हे ‘आम आदमी’ आहेत बरं. यावर वाटते की, अरविंद केजरीवालांसारखी व्यक्ती आम आदमी आहेत, तर मग ‘दिल्ली का ठग’ कोण आहे?
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.