सणासुदीच्या काळात सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा?
29-Sep-2024
Total Views |
मुंबई : सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती वापरातील १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून एलपीजी किमतीत बदल होण्याची शक्यता वर्तविली जात असून यामध्ये एलपीजीच्या किमती, आधारचे नियम आणि लहान बचत योजनांमधील बदलांचा समावेश आहे.
दरम्यान, नियमातील बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबर सुरू होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमती बदल असतात. ऑक्टोबर २०२४ साठी नवीन दर दि. ०१ ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. अलीकडेच १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वारंवार बदल होत आहेत. परंतु, १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत काही काळासाठी स्थिर आहेत.
दि. ०१ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटनुसार, दिल्लीत १९ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत १,६५२.५० रुपयांवरून ३९ रुपयांच्या वाढीसह १,६९१.५० रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे, कोलकात्यात १,७६४.५० रुपयांवरून १,८०२.५० रुपये, मुंबईत १,६०५ रुपयांवरून १,६४४ रुपये आणि चेन्नईमध्ये १,८१७ रुपयांवरून १,८५५ रुपयांपर्यंत वाढले.