मुंबई : सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांची मोठी ऑफर सुरू असून विक्रमी विक्रीची अपेक्षा कंपन्यांना असणार आहे. अॅमेझॉन इंडियाकडून सणासुदी काळातील रणनीती बनविण्यासाठी, कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपनीकडून फ्लॅगशिप फेस्टिव्ह सेल 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' बाजारात दाखल झाला आहे.
दरम्यान, ॲमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष सौरभ यांनी युरोपच्या दौऱ्यावरून परतून सणासुदीच्या काळात अपेक्षित असलेला प्रतिसाद विचारात घेत त्वरित निर्णय घेण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील कंपनी मुख्यालयात रणनीती ठरविली जात आहे. विशष म्हणजे ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो आणि मिंत्रा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विक्री सुरू झाली आहे.
ऑनलाईन सेल सुरू झाल्यानंतर लाखो खरेदीदारांनी ई-कॉमर्स कंपन्यांच्या सणासुदीच्या विक्रीत विशेष सौदे मिळविण्यासाठी स्पर्धा केली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनी सणासुदीच्या विक्रीदरम्यान भारतातील लाखो ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी त्यांचे ऑपरेशनल नेटवर्क देखील वाढविले आहेत.
ई-कॉमर्सच्या बिझनेस मॉडेलवर लक्ष टाकल्यास बिझनेस युनिट्स, टेक्नॉलॉजी, लॉजिस्टिक, मार्केटिंग आणि ग्राहक सेवा यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे, लाखो खरेदीदारांना सहज आणि कार्यक्षम ग्राहक अनुभव प्रदान करणे हेदेखील ई-कॉमर्स कंपन्याचे ध्येय आहे. यावेळी कंपनी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा उपलब्ध करून देऊ शकेल यासाठी कंपन्यांनी आधीपासून युद्धपातळीवर नियोजन केले आहे.
अॅमेझॉन इंडियाने यंदा ॲमेझॉनने २० वॉर रूम तयार केल्या आहेत. तर गेल्या वर्षी १० वॉर रूम तयार केल्या होत्या. या वॉर रुमच्या माध्यमातून रिअल-टाइम डॅशबोर्डसह सुसज्जतेसह वॉर रूमला वेबसाइट ट्रॅफिक, विक्री कार्यप्रदर्शन, ग्राहक भावना आणि सिस्टम स्थिती इत्यादीबद्दल थेट अपडेट देता येते.