अमेरिकेत हिंदू मंदिरांवर हल्ले; स्वामी अनिरुद्धाचार्यंची यूएस सरकारकडे महत्त्वाची मागणी

    27-Sep-2024
Total Views |

Swami Aniruddhacharya

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Swami Aniruddhacharya)
"अमेरिकेत हिंदू मंदिरांवर हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या घटनेची सविस्तर चर्चा व्हायला हवी. भारत आणि अमेरिकेचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे अशा कृती पुन्हा घडू नयेत यासाठी अमेरिकन सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत.", असे मत उत्तर प्रदेशाच्या वृंदावन येथील कथाकार स्वामी अनिरुद्धाचार्य यांनी व्यक्त केले. सॅक्रामेंटो, कॅलिफोर्निया येथील बॅप्स स्वामीनारायण मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ते बोलत होते.

हे वाचलंत का? : सनातन हाच मानवतेला पुढे नेण्याचा एकमेव मार्ग आहे : जगदीप धनखड

आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना पुढे ते म्हणाले, अमेरिकेतील सरकारने हिंदूंच्या मंदिरांचे संरक्षण केले पाहिजे. हा दहशतवादाचा प्रकार असेल तर सरकारने हे षड्यंत्र रोखण्यासाठी त्वरीत कठोर पावले उचलली पाहिजेत. आज सनातन धर्म आणि हिंदू जगभर संकटात आहेत. त्यामुळे मंदिरे आणि सनातनी यांची सुरक्षा आवश्यक आहे. हिंदू संस्कृती सर्वांच्या दृष्टीने संकटात आहे. अशा कृती पुन्हा होऊ नयेत यासाठी अमेरिकन सरकारने ठोस पावले उचलायला हवीत.