वर्षा गायकवाडांचे खरे रूप

    26-Sep-2024   
Total Views |
congress leader varsha gaikwad


काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार. पण, समजा पाच वर्षे त्यांनी काही काम केले नाही, तरी त्यांच्या विरोधात आपण काही बोलू शकत नाही. कारण, त्यांनी अशा माणसाला हरवले, जो आपल्या ‘कौम’च्या विरोधात आहे. जिंकला असता, तर आपल्या ‘कौम’साठी धोका होता. ती मुस्लीम व्यक्ती म्हणाली, “दहशतवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा व्हावी, म्हणून महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना वर्षा यांनी पराभूत केले.” म्हणून त्या मुस्लीम व्यक्तीला किती आनंद झाला होता. जणू अजमल कसाब त्यांचाच नातेवाईक. वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला ही अशी विघातक किनार आहे. ‘व्होट जिहाद’ झाल्यावर वर्षा गायकवाड जिंकल्या, हे सत्य वर्षाताईंना आणि काँग्रेसलाही चांगलेच ठावूक आहे. अर्थात, मुस्लीमधार्जिणे असणे हा काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवड यांचा जन्मजात हक्कच आहे म्हणा! नुकतेच धारावीमधील मशिदीजवळील बेकायदेशीररित्या जागेवर अतिक्रमण करणार्‍या लोकांच्या समर्थनार्थ वर्षा गायकवाड तिथे गेल्या. आपल्या पदाचा वापर करत त्यांनी अवैध बांधकामावर होणारी कायदेशीर कारवाई रोखली. वर्षा गायकवाडांचे हे कृत्य संविधानविरोधी होते. इतकेच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधातले होते. पण, सत्तेसाठी मदांध झालेल्या वर्षा आणि त्यांच्या काँग्रेसला संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी काही देणे-घेणे नाही. ज्या समाजाने त्यांना आपल्या समाजाची मुलगी म्हणून राजकारणातल्या इतक्या संधी दिल्या, त्या समाजासाठी वर्षा गायकवाडांचे योगदान काय? आज महाराष्ट्रभर मागासवर्गीय समाजावर मुस्लीम समाजातील काही लोकांकडून अत्याचाराच्या घटना घडतात. पण, त्याबाबत वर्षाताई गप्पच! कारण, त्यांना समाजाशी काही देणे-घेणे नाही. त्यांचे इमान तर केव्हाच विकले गेले आहे. वर्षा गायकवाड यांच्या कर्तृत्वाची पाटी कोरी होती, त्या पाटीवर आता एक काळीकुट्ट बाजू रंगली आहे, ती म्हणजे मुस्लीम समाजातील काही विघातक लोक वर्षा यांना पाठिंबा देत आहेत. कारण, त्यांनी कसाबविरोधात खटला चालवणार्‍या उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. यावर प्रबुद्ध समाज म्हणत आहे की, वर्षाताई, तुमचे खरे रूप उघड झाले. यापुढे डॉ. आंबेडकरांचे नाव चुकूनही घेऊ नका. त्यांचे नाव घेण्याची तुमची पात्रता नाही!


एमआयएम आणि पुतना


नितेश राणे आणि संत रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी एमआयएम पक्षाचा नेता माजी खासदार इम्तियाज जलीलने नुकताच मोर्चा काढला. छत्रपती संभाजी नगरपासून सुरू होणारा हा मोर्चा मुंबईमध्ये दि. 23 सप्टेंबर रोजी धडकणार हेाता. मुंबईत आल्यावर म्हणे इम्तियाज जलील महाराष्ट्राच्या सत्ताधारी महायुतीतील नेत्यांना तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना संविधानाची प्रत भेट देणार होता. खरे तर, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने भाजपची म्हणजे प्रभू श्रीराममंदिरासाठी जंगजंग पछाडणार्‍या पक्षाची सत्ता असल्याने ओवेसी यांची एमआयएम पार्टी, त्यांचे पदाधिकारी भलतेच सैरभेर झाले. या मोर्चामध्ये ठिकठिकाणांहून मुस्लीम समुदाय मुंबईकडे यायला निघाले. मागणी काय, तर संत रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई करा. त्यासाठी त्यांचे नारे काय होते, तर ‘सर तन से जुदा.’ हे सगळे मुंबईच्या दिशेने निघाले ते संविधानाचे नाव घेऊन. पण, या मोर्चात संविधानिक काय होते? असो. ही यात्रा मुलुंड येथे अडवली गेली. अर्थात, प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो. तसा तो मुस्लिमांनाही असायलाच हवा. मात्र, आपण ज्या देशात राहतो, त्या देशात लोकशाही आहे आणि संविधानही आहे. इथे ‘शरीया कायदा’ लागू नाही, की हा देश ‘इस्लामिक रिपब्लिक’ नाही, हे या मोर्चात सहभागी झालेल्या आणि ओवेसी बंधूंसह त्यांच्या एमआयएम पक्षाने लक्षात ठेवायला हवे. आता इम्तियाज जलील आणि एमआयएम पक्षाला संविधान आठवले. पण, ‘15 मिनिटे पोलीस हटवा, मग हिंदूंचा कसा सफाया करतो,’ असे गर्वाने म्हणणे, बांगलादेशच्या रोहिंग्यासाठी मुंबईत हिंसक दंगल घडवणे, बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात त्यांच्या धार्मिक मिरवणुकीवर दगड फेकणे, ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ करणे ही असली कृत्ये काही संविधानिक नाहीत. मात्र, ओवेसी आणि इम्तियाज जलीलसह एमआयएम पक्ष या असंविधानिक घटनांबद्दल काही बोलताना दिसत नाहीत. एमआयएम पक्षाने संविधानाचे नाव घेणे, हाच खरं तर एक मोठा विरोधाभास आहे. एमआयएम पक्षाच्या नेत्यांचे हे संविधानप्रेम तर पुतनामावशीचे प्रेमापेक्षासुद्धा भारीच!

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.