रॉकेटच्या गतीने उडाला हा शेअर जाणून घ्या काय आहे कारण?
23-Sep-2024
Total Views |
मुंबई : व्होडाफोन आयडियाचे शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आज तब्बल ८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बाजारात उघडताच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वृध्दी दिसून आली. तसेच, कंपनीने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत नेटवर्क उपकरण पुरवठा करार पूर्ण केला आहे. परिणामी, कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होऊन गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.
दरम्यान, व्होडाफोन आयडियाने तब्बल २९,८८० कोटी रुपये तीन वर्षांच्या कालावधीसाठी नेटवर्क उपकरण पुरवठा करार केला आहे. याचा परिणाम थेट कंपनीच्या समभागांवर दिसून आला आहे. सद्यस्थितीस कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ८.९६ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर ११.४२ रुपये इतका झाला आहे.
विशेष म्हणजे व्होडाफोन आयडियाच्या तीन वर्षांच्या भांडवली खर्चाच्या(भांडवली खर्च) योजनेतील हा करार हा पहिला टप्पा आहे. याची अंदाजे किंमत ५५,००० कोटी रुपये असून कंपनीच्या समभागांची वाढ ही ३० हजार कोटी रुपयांच्या मेगा डीलचा परिणाम आहे. परिणामी, व्होडाफोन आयडिया कंपनीच्या समभागधारकांना गुंतवणुकीत मोठा फायदा झाला असून आगामी काळात कंपनीच्या कामगिरीवर गुंतवणूकदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.