पुण्यात पार पडला 'बनारस लिट फेस्टिवल'

    23-Sep-2024
Total Views |

बनारस

 
पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पुणे’ शहरात शनिवार 21 सप्टेंबर रोजी ‘बनारस लिट फेस्टिवल’ पार पडला. ‘पुणे’ आणि ‘वाराणसी’ म्हणजेच बनारस या दोन्ही शहरांना साहित्यिक, कलात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मोठे महत्व आहे. या दोन्ही शहरातील कला, साहित्य आणि संस्कृतीचा मिलाफ या ‘बनारस लिट फेस्टिवलमध्ये’ सादर झाला. पुण्यातील सावित्रीबाई विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात संवाद, चर्चासत्र आणि कविसंमेलन असे विविध कार्यक्रम सादर झाले. हिंदी पंधरवड्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते 'बनारस लिट फेस्टिव्हल'चे उद्घाटन होणार झाले. प्रसिद्ध सिनेकलाकार यशपाल शर्मा, बनारस व महाराष्ट्रातील साहित्य- कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.