ब्रिटनमधील टाँटन ते हिंकले पॉईंट सीपर्यंतच्या किनारी भागात एक भव्यदिव्य प्रकल्प आकार घेत आहे, जो ब्रिटनच्या इतिहासातील पहिलाच भव्य न्यूक्लिअर रिअॅक्टर प्रकल्प म्हणावा लागेल. या प्रकल्पाच्या सपाट भूभागाकडे जाणारा प्रवास हा नयनरम्य जंगलांतून, दर्यांमधून आणि छोट्या कच्च्या रस्त्यांवरून होतो. हे विशाल बांधकाम मोठ्या लोकसंख्येच्या केंद्रांपासून मुद्दामच कोसो मैलो दूर आहे.
ब्रिटनमधील टाँटन ते हिंकले पॉईंट सीपर्यंतच्या किनारी भागात एक भव्यदिव्य प्रकल्प आकार घेत आहे, जो ब्रिटनच्या इतिहासातील पहिलाच भव्य न्यूक्लिअर रिअॅक्टर प्रकल्प म्हणावा लागेल. या प्रकल्पाच्या सपाट भूभागाकडे जाणारा प्रवास हा नयनरम्य जंगलांतून, दर्यांमधून आणि छोट्या कच्च्या रस्त्यांवरून होतो. हे विशाल बांधकाम मोठ्या लोकसंख्येच्या केंद्रांपासून मुद्दामच कोसो मैलो दूर आहे. सॉमरसेट किनार्यावरील ब्रिस्टल चॅनेलच्या पुढे एका सपाट मैदानात हा प्रकल्प पसरलेला आहे.
सॉमरसेट किनार्यावर हिंकले पॉईंट सी हा भव्य प्रकल्प दोन दशकांहून अधिक काळातील ब्रिटनमधील पहिला नवीन आण्विक ऊर्जा केंद्र प्रकल्प. लाखो लोकांसाठी विश्वासार्ह, कार्बनरहित वीजनिर्मितीचे उद्दिष्ट असलेला हा प्रकल्प. या प्रकल्पाचा प्रवास काहीसा राजकीय अस्थिरता, तांत्रिक गुंतागुंतीचा सामना करत पुढे जात आहे. आत्तापर्यंत प्रकल्पाचे बजेट १९.६ युरो अब्जांवरून ३३युरो अब्जांपर्यंत म्हणजेच दुपटीने वाढले आहे. मात्र, आव्हाने असूनही, या प्रकल्पाची क्षमता निर्विवाद आहे. २०२७ मध्ये प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, त्याचे दोन ‘युरोपियन प्रेशराईज्ड रिक्टर्स’ (एझठी) ३.२ गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्माण करतील, दरवर्षी सहा दशलक्ष घरांना वीज पुरवतील आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करतील. बांधकाम आणि ऑपरेशन दरम्यान या प्रकल्पातून हजारो नोकर्या निर्माण झाल्या. यासह प्रादेशिक अर्थव्यवस्थेमध्ये या प्रकल्पामुळे अब्जावधींचा समावेश होतो.
प्रकल्पाची स्थापत्य अभियांत्रिकीची कामे प्रगतिपथावर आहेत. दोन अणुभट्ट्यांपैकी एक फिट-आऊटच्या जवळ आहे आणि दुसर्याचे बांधकाम सुरू आहे. सिव्हिल अभियांत्रिकी टप्प्यापासून जटिल यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि हीटिंग फिट-आउट स्टेजवर हलविण्याच्या प्रकल्पासह इतरत्र कामे प्रगतिपथावर आहेत. या बांधकामस्थळावर ५८ क्रेन आहेत. त्यांपैकी एक बिग कार्ल ही जगातील सर्वात मोठी जमिनीवरील क्रेन आहे. ही क्रेन १२जिनांद्वारे समर्थित असून ९६चाकांवर फिरणारी पाच हजार टन वजन उचलू शकते. प्रकल्पस्थळावर काम करणारे हजारो कामगार रहदारीत अडकू नयेत, यासाठी एक समर्पित बस कंपनी स्थापन करण्यात आली आहे. ही कंपनी सुमारे ११हजार कर्मचार्यांना १७६ बसेसच्या ताफ्यातून घरापासून ने-आण करते. यामध्ये १७६ हेक्टर परिसरात कर्मचार्यांची वाहतूक करण्याचा मार्ग समाविष्ट आहे.
हिंकले पॉईंट सी ही १९९५ मध्ये सीझवेल बी पूर्ण झाल्यानंतर बांधण्यात येत असलेली पहिली अणुभट्टी आहे. हिलाच ‘युरोपियन प्रेशराईज्ड वॉटर रिऍक्टर’ (एझठ) असे म्हणतात. हिंकले पॉईंट सी हा युरोपमध्ये बांधण्यात येणारा जगातील तिसरा प्रकल्प आहे. पहिला फिनलंडमधील ओल्किलुटो येथे आणि दुसरा फ्रान्समधील फ्लॅमनविले येथे बांधला गेला. यांपैकी प्रत्येक प्रकल्प हा ठरविलेल्या बजेटपेक्षा अधिक खर्चिक ठरला, तर तयार होण्यासाठी अंदाजापेक्षा जास्त वेळ लागला आहे. ताज्या अंदाजानुसार, हिंकले पॉईंट सीची किंमत ३४अब्ज युरो इतकी असेल, जी १८अब्ज युरोच्या मूळ बजेटच्या जवळपास दुप्पट आहे. मूलतः हा प्रकल्प २०२५ पूर्ण करणे नियोजित होते. मात्र, आता प्लांट २०३१ पर्यंत कालावधी घेऊ शकतो. या अणुभट्टीच्या बाहेरील आणि आतील भिंती या विमानाचा आघात, भूकंप आणि भरतीच्या लाटा यांसह जोखीम पेलणार्या आहेत.
साईटवरील कर्मचार्यांना दिलेल्या संदेशात हिंकले पॉईंट सीचे व्यवस्थापकीय संचालक स्टुअर्ट क्रुक्स म्हणाले की, ‘कोविड १९’च्या काळात प्रकल्पाला १५महिन्यांचा विलंब झाला होता. एका मोठ्या विश्रामानंतर ब्रिटनमध्ये अणु बांधकाम उद्योग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. २०वर्षांचा कालावधी उलटून गेल्याने दरम्यानच्या काळात अणु कौशल्ये पुन्हा शिकणे, एक नवीन पुरवठा साखळी तयार करणे आणि कामगारांना प्रशिक्षण देणे हे आव्हानात्मक काम आहे. इतर पायाभूत प्रकल्पांप्रमाणेच आम्हाला फायदा अपेक्षित होता. मात्र, ‘कोविड’ आणि ‘ब्रेक्झिट’ व्यत्ययाच्या शीर्षस्थानी प्रकल्पाला महागाई, कामगार आणि साहित्याचा तुटवडा सहन करावा लागला. तथापि, प्रकल्प खर्च हा एक प्रमुख चिंतेचा विषय आहे. मात्र, हा प्रकल्प ब्रिटनच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक चाचणी घेणारा प्रकल्प आहे. प्रकल्पाचे यश पृष्ठभागाखालील तांत्रिक अडथळे आणि वरील राजकीय प्रवाह हे दोन्ही हाताळण्यातील क्षमता यांवर अवलंबून आहे. हा प्रकल्प केवळ लाखो घरांना प्रकाश देणार नाही, तर ब्रिटनच्या प्रगत शाश्वत ऊर्जा भविष्याचा मार्ग मोकळा करेल.