मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Arogya Bharati) आरोग्य भारतीचे 'अखिल भारतीय प्रतिनिधी मंडल संमेलन' यंदा मध्य प्रदेशच्या ग्वालियात याठिकाणी होत आहे. दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी राजमाता विजयाराजे सिंधिया कृषि विश्वविद्यालय परिसर, ग्वालियार येथे सदर संमेलन पार पडेल. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व कार्यकर्ता, सर्व क्षेत्र-सह क्षेत्र संयोजक, सर्व प्रचारक, पूर्णकालिक कार्यकर्ता, सर्व प्रांतांच्या कार्यकारिणीचे कार्यकर्ते, काही निमंत्रित अतिथी संमेलनाला अपेक्षित आहेत.
गेल्या २२ वर्षांत आरोग्य भारतीचे कार्य देशभरातील ८७ टक्के जिल्ह्यांपर्यंत विस्तारले आहे. १४ प्रकारच्या विभिन्न विषयांत आरोग्य भारतीचे कार्यकर्ते काम करत आहेत. या कार्याबाबतचे चिंतन, त्याविषयी चर्चा अ.भा. प्रतिनिधी मंडल संमेलनात करण्यात येईल. तसेच मागील वर्षांत झालेल्या कार्याचा आढावादेखील यावेळी घेण्यात येईल.