मुंबई : मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्सच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिनाच्या’ निमित्ताने मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या जगभरातील तमाम मराठी माणसांसाठी लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मराठीचे भवितव्य : आपली जबाबदारी’ हा या लेखस्पर्धेचा विषय आहे. ही लेख स्पर्धा पहिला गट (वय वर्षे १६ ते ३०) आणि दूसरा गट (वय वर्षे ३० च्या पुढील) अशा दोन गटांमध्ये होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी लेख टाईप करून lekhmiti24@gmail.com ह्या ईमेलवर आपले नाव, ठिकाण संपर्क क्रमांकासंहित पाठवायचा आहे. लेखासाठी शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे. लेख पाठवाण्यासाठी अंतिम तारीख १ ऑक्टोबर आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तिपत्रक आणि पुस्तकांच्या स्वरूपात पारितोषिक मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९९३०११५७५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.