बजाज हाऊसिंग फायनान्स समभागांमध्ये मोठी घसरण; पीएनजी ज्वेलर्सची धमाकेदार एंट्री!

    18-Sep-2024
Total Views |
bajaj housing finance shares cracks


मुंबई :      बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ११४.२९ टक्क्यांसह शेअर १५० रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्यानंतर आता कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, कंपनी सूचीबध्द झाल्यानंतर सलग दोन दिवस १० टक्के वाढ नोंदविण्यात आली होती. त्याचबरोबर, शेअर्स अप्पर सर्किटसह मोठी वाढ दर्शविली होती.

 
दरम्यान, बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीने १.५ लाख कोटींहून अधिक बाजार भांडवल(एम-कॅप) कमांड केले आहे. बजाज हाऊसिंगचे बाजार भांडवल आधार हाउसिंग, एलआयसी हाउसिंग, आवास फायनान्सर्स आणि ऍप्टस व्हॅल्यू यासह देशातील प्रमुख १० हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन्सपेक्षा जास्त आहे. शेअर्स ४.३२ टक्के घसरणीसह प्रतिशेअर १७४ रुपयांवर स्थिरावला आहे.
 

पुना गाडगीळ ज्वेलर्स आयपीओची धमाकेदार एंट्री!
 
पुना गाडगीळ ज्वेलर्स कंपनी शेअर बाजारात सूचीबध्द झाली असून गुंतवणूकदारांना आयपीओच्या माध्यमातून मोठा परतावा मिळाला आहे. कंपनी सुमारे ७४ टक्के प्रीमियमसह ८३४ रुपयांवर सूचीबध्द झाल आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सूचीबध्द होताच गुंतवणूकदारांनी सूचीबध्दतेवरच ३५० रुपयांपेक्षा जास्त नफा कमाविला आहे. आयपीओ प्रतिशेअर ४५६ ते ४८० रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला असून एका लॉटमध्ये ३१ असून १४,८८० रुपयांचा एक लॉट होता.