बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका कट्टरपंथी जावेद नावाच्या व्यक्तीने छेडछाड करत एका महिलेला धारदार ब्लेडने वार करत जखमी केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. महिलेने आरडाओरड करत आसपासच्या लोकांनी आरोपी जावेदला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणात आता जावेदला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. ही घटना १७ सप्टेंबर रोजी मंगळवारी घडली.
प्रसारमाध्यमानुसार, ही घटना बरेलीच्या कोतवाली पोलीस ठाणे परिसरात घडली . बरादरी परिसरात राहणारी महिला अनेकदा उद्यानात फिरायला येत होती. मात्र मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास माहिला आपल्या दोन मुलांसह उद्यानात फिरायला आली होती, दरम्यान जावेद घटनास्थळी येत त्याने पीडितेची छेड काढायला सुरूवात केली.
यावेळी पीडितेने जावेदच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते. महिलेने नकार दिल्याने जावेदला राग अनावर झाला. त्याने आपल्य़ाजवळ असलेल्या ब्लेडने पीडितेवर सपासप वार केले. मात्र, पीडितेने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. महिलेने स्वत: ला वाचवले. जखमी पीडितेने आरडाओरडा सुरू केला. तेव्हा आरडाओरड करून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जावेदला मारहाण केली.
याप्रकरणात पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जावेदला आपल्या ताब्यात घेतलेय दरम्यान याप्रकरणी आरोपी जावेदविरूद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांतर्गत एफआऱआ।य दाखल करण्यात आला. यावेळी कोतवाली पोलिसांनी दोघेही एकाच समाजाचे असल्याचे सांगून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.