हिजबुल्लाहच्या प्रत्येक पेजरमध्ये ३ ग्राम विस्फोटक? काय आहे पेजर स्फोटामागील थिअरी?

    18-Sep-2024
Total Views | 50

 
 
Hezbollah
 
लेबनॉन : मध्य पूर्व देशात लेबनॉनमध्ये एकाच वेळी हजारो स्फोट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी घडली आहे. हिजबुल्लाहच्या प्रत्येक पेजरमध्ये ३ ग्राम विस्फोटक असल्याचा दावा हिजबुल्लाह या आतंकवादी संघटनेने केला आहे.  पेजर हे संदेश प्राप्त करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी वापरले जाणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. लेबनॉन आणि शेजारी असणाऱ्या देशांपैकी सीरियात एकाच वेळी हजारो पेजर्सचा स्फोट झाला. यामध्ये सुमारे ३ ००० नागरिक जखमी झाले असून यामध्ये ११जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा नेमका स्फोट आहे की घातपात? असा सवाल निर्माण होत आहे.  
 
जखमींपैकी अनेक नागरिक हे इस्लामिक दहशतवादी संघटना हिजबुल्लाशी संबंधित होते. पेजर स्फोट घडवून आणल्याचा आरोप हिजबुल्लाहने इस्त्रायलवर केला आहे. यावेळी एकाच वेळी पेजर कसे फुटले गेले असा सवाल हिजबुल्लाहने उपस्थित केला आहे. पेजर्सना सिंग्नल पाठवल्याने हा स्फोट झाल्याचे बोलले गेले आहे. लेबऩॉनने याबाबत इस्त्रायलवर आरोप केले असल्या़चे बोलले जात आहे.
  
लेबनॉनमध्ये झालेला हा स्फोट पेजर अधिक गरम झाल्याने झाला. पेजर ठेवणाऱ्या नागरिकांमुळे इतर आजूबाजूच्या लोकांना याचा फटका बसला आहे. हिजबुल्लाहने म्हटले की, इस्रायलने हजारो पेजर्समधील सिग्नल हॅक केले आणि इतक्या वारंवारतेने मेसेज पाठवले की ज्यामुळे असंख्य बॅटरी गरम झाल्याने स्फोट झाला.
 
पेजर्सचा पुरवठा करताना इस्रायलने तैवानमधून ५,००० पेजर्स मागवण्यात आले होते. ते या वर्षाच्या सुरूवातीला हिजबुल्लाहर्यंत पोहोचले होते. पेजर्स हे फार जूने इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. मात्र हिजबुल्लाह दहशतवादी संघटना हे उपकरण वापरते. याच उपकरणासोबत इस्रायने कट रचत हल्ला केल्याचे हिजबुल्लाहचे म्हणणे आहे.
 
तसेच याप्रकरणात पेजरमध्ये ३ ग्रॅम स्फोटके निर्माण करण्यात आली असल्याचा दावा हिजबुल्लाहने केला. पेजरचे वाटप नागरिकांमध्ये  करण्यात आले होते. यावेळी इस्त्रायलने योग्य संधी पाहून धमाका केला. आता हेच जुने पेजर उपकरण हिजबुल्ला आतंकवादी संस्था का वापरत होती? असा सवाल अनेकांना पडला. याचे कारण आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी अनेक वर्षांपूर्वीचा जूना पेजर वापरण्याचे कारण म्हणजे मोबाईल संपर्क केल्याने विरोधक आपल्या मोबाईलमधील सर्व माहिती काढून घेतील. त्यामुळे पेजर हे उपकरण वापरले गेल्याचे कारण आहे. मात्र पेजर वापरले गेले असले तरीही त्याच परिस्थितीला हिजबुल्लाह आतंकवादी संघटना आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या लोकांना समोरे जावे लागले आहे. हे उपकरण वापरण्यास सोपे असून हॅक करणे सोपे नाही, असे कारण देण्यात आले होते.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121