पेजर्सनंतर वॉकीटॉकीत स्फोट

    18-Sep-2024
Total Views |

Hezbollah
 
बेरूत : हिजाबहुल्ला (Hezbollah) आतंकवादी संघटनेतील लोकांच्या पेजर्सचा स्फोट झाल्याची घटना लेबनॉनमध्ये १७ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणात ४ हजार लोकं जखमी झाली असून ११ लोकं मृत्यूमुखी प़डली आहेत. मात्र याप्रकरणानंतर आता हिजाबुल्लाहच्या वॉकीटॉकीचाही स्फोट झाला आहे.
 
याप्रकरणी आता हिजाबुल्लाहच्या सूत्रांनी घडलेल्या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, वापरल्या जाणाऱ्या वॉकीटॉकींचा स्फोट होऊ लागला आहे. यामुळे दक्षिणेकडील लेबनील शहर नाबतिया, टायर आणि सिडॉनलाही स्फोटांचा फटका बसला आहे.
 
मात्र असे असले तरीही घडलेल्या याप्रकरणाबाबत इस्त्रायलने भाष्य केलेले नाही. अहवालात त्यांनी म्हटले की, स्फोट लहान हल्ल्याशी संबंधीत होता. लेबनॉलच्या राज्य- नियंत्रित नॅशल न्यूज एजन्सीने दावा करत सांगितले की, देशाच्या पूर्वेकडील प्रदेशात नुकत्याच झालेल्या स्फोटांमध्ये तीन लोकं ठार झाली आहेत, तर सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, शेकडो जखमी झाले असून याबाबत मिळवलेल्या माहितीची पुष्टी केली असे बोलले जात आहे.
 
 
 
दरम्यान, मोसादने हिजबुल्लाहद्वारे आयात केलेल्या हजारो पेजर्समध्ये स्फोटक होती. यामुळे पेजर्सचा स्फोट झाला आहे. अशातच गेल्या ऑक्टोंबरपासून उत्तर इस्त्रायलवर ८ हजाराहून अधिक रॉकेटने हल्ले केले होते. इस्त्रायलच्या सैन्यांनी लेबनॉलमध्ये हिजबुल्लाहवर लक्ष केंद्रीत करत तोफखान्याने प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलने रॅकेट हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. यामुळे हे पेजर्स युद्ध सुरू आहे.