भारत जगातील २१व्या शतकातील सर्वोत्तम स्थान - पंतप्रधान मोदी
16-Sep-2024
Total Views |
मुंबई : केंद्र सरकारने तिसऱ्या टर्मच्या पहिल्या शंभर दिवसांत देशाच्या वेगवान प्रगतीसाठी प्रत्येक क्षेत्रावर आणि घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे ‘ग्लोबल रिन्यूएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीट अँड एक्झिबिशन’ (री-इन्व्हेस्ट २०२४) च्या चौथ्या आवृत्तीला संबोधित करताना केले.
ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांत तुम्ही आमचे प्राधान्यक्रम, गती आणि प्रमाण पाहू शकता. असे सांगताना देशाच्या वेगवान प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक क्षेत्राकडे आणि घटकांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, केवळ देशवासियांनाच नाही तर संपूर्ण जगाला भारत हे २१व्या शतकातील सर्वोत्तम स्थान वाटत आहे.
भारताची विविधता, प्रमाण, क्षमता आणि कार्यप्रदर्शन अतुलनीय असून जागतिक वापरासाठी भारतीय उपायांना प्राधान्य देतो, असे मोदी म्हणाले. २१व्या शतकात भारत हा सर्वोत्तम पर्याय आहे असे संपूर्ण जगाला वाटते. तसेच, केंद्र सरकार अयोध्या आणि इतर १६ शहरांना मॉडेल 'सोलर सिटी' म्हणून विकसित करण्यासाठी काम करत आहे. देशातील १४० कोटी भारतीयांनी देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प केला आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.