जिहादी शाहबाजने ओळख लपवून हर्षित चौधरी असल्याचे सांगून अनेक हिंदू मुलींचे केले लैंगिक शोषण

    12-Sep-2024
Total Views |

Love Jihad
लखनऊ : शाहबाज नावाच्या कट्टरपंथी युवकाने हर्षित चौधरी या नावाचा वापर करत आपण हिंदू असल्याचे सांगत अनेक हिंदू मुलींशी खोटे प्रेमसंबंध ठेवत लव्ह जिहादचे कृत्य केले. खोटी ओळख निर्माण करून त्याने अनेकदा पैसे उकळले आहेत. त्याचा हा धक्कादायक प्रकार ३१ ऑगस्ट रोजी उघडकीस आला असून याप्रकरणात अहमदाबाद पोलिसांनी शाहबाजला दिल्लीतून पक़डले होते.
 
प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथे ३१ ऑगस्ट रोजी वंदे भारत ट्रेन येथे एक बॅग चोरीला गेली होती. या चोरीच्या तपासात पोलिसांना हर्षित चौधरी नावाचा व्यक्ती सापडला. पोलिसांनी त्याच्या तिकिटावरून माहिती काढली आणि त्याचा क्रमांक ट्रेस केला असता सर्व माहिती समोर आली. अहमदाबाद पोलिसांना कट्टरपंथी युवकाचे दिल्लीतील लोकेशन सापडले होते. त्यावेळी त्याचे ओळखपत्र असलेले अधारकार्ड आणि पॅन कार्ड बनावट निघाल्याची माहिती पोलिसांनी तपासादरम्यान सांगितली होती. तसेच लष्कराचे ओळखपत्रही बनवले असल्याचे निष्पन्न झाले.
 
याप्रकऱणात पोलिसांनी लक्ष घालत चौकशी केली असता, तो हर्षित चौधरी नसून अलिगढचा रहिवाशी मोहम्मद शाहबाज असल्याचे समोर आले. जो बनावट ओळखीच्या आधारे ऑनलाईन वेबसाईटद्वारे हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात अडकवतो. पोलिसांनी त्याचा फोनही तपासला त्याच्या फोनमध्ये सुमारे २४ मुलीचे फोटो सापडले.
 
पोलिसांनी चौकशी केली असता, शाहबाजने सांगितले की, तो स्वत:ची ओळख मेजर म्हणून सांगायचा. त्यांच्या मदतीने तो पैसे कमावणाऱ्या अनेक मुलींशी प्रेमसंबंध ठेवत आपल्या जाळ्यात अडकवायचा. त्याने सांगितले की, तो मॅट्रिमोनी साईटवर मुलींना लग्न करण्याचे आश्वासन द्यायचा.
 
मोहम्मद शाहबाजने झारखंडमधील एका हिंदू मुलीशी लग्नही केले आहे, तो तिला अलीगढला घेऊन जायचा. हा विवाह हिंदू पद्धतीने झाला. मुलीलाही आता कळले की तिचे लग्न हर्षितसोबत नसून शाहबाजशी झाले आहे. याप्रकरणात आता लव्ह जिहादला बळी पडलेल्या हिंदू तरूणीने अलीगढ येथे एफआरआय दाखल केला असून शाहबाजने तिला मारहण केली. यावेळी हिंदू पीडितेने जबरदस्तीने तिच्याशी शरीरिक संबंध ठेवायचा असा आरोप केला आहे. यावेळी याप्रकरणात अलिगढ पोलिसांनी गुजरात येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात शाहबाजचे  पाच वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याला २ मुले असल्याची माहिती याप्रकरणातून आढळली.